गढी ग्रामपंचायतच्या वतीने अपंगाना ग्राम निधी अतर्गत 5% टक्के प्रमाणे निधी वाटप
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज दिनांक 28 / 4 /2026 रोजी सकाळी 11 = 00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी येथे गढी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी पठण आय व्ही .व गढी ग्रामपंचायतचे क्लार्क नारायण जाधव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गढी येथील अपंगाना 5% टक्के प्रमाणे ग्राम निधीचे वाटप करण्यात आले . या निधी वाटप कार्यक्रमास गढी गावातील नोदणीकृत अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पठाण आय व्ही यांनी सर्व आलेल्या अपंग बांधवाना गढी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतुन 5% टक्के निधी अपंग बांधवाना वाटप करत आहोत असे सांगितले यावेळी उपस्थित सर्व अपंगांना निधीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थितीत अपंग बांधव सखाराम पोहिकर . विक्रम कांबळे . राहुल कांबळे . अमर कांबळे . आशाबाई सोळुके .बबलू शेख . ताहेरा भाभी . आयशा शेख . इतर अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
Comments
Post a Comment