पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाणी संकट; बोअर आटले, रुग्ण त्रस्त प्रशासनाने तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी


पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णालयातील बोअरवेल पूर्णपणे आटल्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन कामकाज यावर गंभीर परिणाम झाला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर धावपळ करावी लागत आहे. अनेकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत असून आर्थिक भारही वाढत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.भर उन्हाळ्यात अशा प्रकारे रुग्णालयात पाणीटंचाई निर्माण होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ पाण्याची टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी