Posts

Showing posts from August, 2026

लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ

Image
लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ  पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; पंचक्रोशीतील महानुभाव भाविकांची उपस्थिती लिंबागणेश : (दि.२९ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या (दशम स्कंध) सोहळ्यास आज शनिवार, दि. २९ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. धार्मिक विधीनुसार श्रीदत्तात्रेय व लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यात आली. यावेळी चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. धूप, दीप, फुले व नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पारायण, दुपारी उटी-उपहार, सायंकाळी आरती व प्रवचन, तर रात्री संगीतमय भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड येथील भागवताचार्य प.पू. महंत श्री ओंकार व्यास बाबा शास्त्र...

कोमलवाडीच्या सुनेने कर्तृत्वाचा झेंडा गोंदिया जिल्ह्यात फडकवला

Image
कोमलवाडीच्या सुनेने कर्तृत्वाचा झेंडा गोंदिया जिल्ह्यात फडकवला! भाग्यश्री धनवडे यांची जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील कोमलवाडी गावचे सुपुत्र श्री. शंकर सूर्यकांत धनवडे यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री शंकर धनवडे यांची गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे धनवडे कुटुंबीयांसह संपूर्ण कोमलवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या सौ. भाग्यश्री धनवडे यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षण क्षेत्रात शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले असून, आता गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्या पार पाडणार आहेत. शिक्षक म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी. ही जबाबदारी स्वीकारण्याची संधी सौ. भाग्यश्री धनवडे यांना मिळाल्याने त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीमुळे कु...

बीड जिल्हामध्ये पावसाने ओढ दिली; शेतकरी संकटात

Image
बीड जिल्हामध्ये पावसाने ओढ दिली; शेतकरी संकटात! नद्या-नाले, तलाव, बंधारे कोरडे; खरीप पिके करपली, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर “सरकारने पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता हेक्टरी एक लाखांची मदत द्यावी” — बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी :-  पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले, तरी बीड जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने ग्रामीण भागावर गंभीर संकट ओढवले आहे. नदी, नाले, ओढे, तलाव आणि बंधारे कोरडे पडले असून अनेक गावांतील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही चिंताजनक झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे असे महा एनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. एकीकडे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा मात्र अद्याप अपेक्षित गांभीर्याने मैदानात उतरलेली दिसत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पेरणी केली; मात्र पाऊस नाही खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी के...

महिला सुरक्षेसाठी पाटोदा पेटला!अश्लील मेसेजने संतापाचा स्फोट; महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर, निषेधार्थ पाटोदा बंद

Image
महिला सुरक्षेसाठी पाटोदा पेटला! अश्लील मेसेजने संतापाचा स्फोट; महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर, निषेधार्थ पाटोदा बंद! कुरियरमधून नंबर मिळवून छळ केल्याची घटना; नंबर कुठून मिळाला? पोलिसांसमोर मोठा सवाल! संबंधितांचा तातडीने शोध घेण्याची मागणी पाटोदा | प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारी गंभीर घटना पाटोद्यात घडली असून, एका महिलेला रात्री अश्लील भाषेत मेसेज करून तिचा छळ करण्यात आला. या संतापजनक घटनेने पाटोदा शहर हादरले असून, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. घटनेच्या निषेधार्थ पाटोदा शहर बंद ठेवण्यात आले. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी एका महिलेला रात्री अश्लील स्वरूपाचे मेसेज करण्यात आले. संबंधित महिलेचा मोबाईल नंबर पार्सल अथवा कुरियर सेवेतून मिळवून त्याचा गैरवापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महिलेचा नंबर नेमका कुठून मिळाला? तो कोणाकडून मिळाला? आणि तिच्यापर्यंत पोहोचलेल्या या वैयक्तिक माहितीचा गैरवापर कोणी केला? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. महिलांचा मोबाईल नंबर खासगी की कुणाच्याही वापरासाठी? ग्राहकांचा मोबाईल नंबर हा वैयक्तिक माहि...

पोकळे वस्तीवरील जि.प. शाळा जीर्णावस्थेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Image
पोकळे वस्तीवरील जि.प. शाळा जीर्णावस्थेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर छताचे खपले कोसळत असल्याने विद्यार्थी-शिक्षक जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन; स्ट्रक्चर ऑडिट करून पुनर्बांधणीसाठी निधी द्या :- डॉ. गणेश ढवळे  आष्टी : (दि. २८) आष्टी तालुक्यातील पिंपळा केंद्रांतर्गत लोणी सय्यदमिर येथील पोकळे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्णावस्थेत असून छताचे खपले कोसळून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या शाळेचे तातडीने 'स्ट्रक्चर ऑडिट' करून धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यात यावी तसेच नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून आवश्यक तरतूद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांच्याकडे लेखी न...

पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने   विद्यार्थ्यांच्या फी व शिष्यवृत्तीच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांवरील दडपशाही थांबवण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड : (दि. २७) एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी सीओईपी (COEP) येथील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज दि.२७ गुरुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी “पत्रकारांवरील दडपशाहीचा धिक्कार असो ” लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला सहन करणार नाही" " हुकुमशाही चालणार नाही " अशा घोषणा देत पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री स...

साक्षी सोनवणे यांची राज्य योगासन स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर संघ प्रशिक्षकपदी निवड

Image
साक्षी सोनवणे यांची राज्य योगासन स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर संघ प्रशिक्षकपदी निवड ​छत्रपती संभाजीनगर :आगामी राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या योग प्रशिक्षकपदी साक्षी सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. योगासन क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, खेळाडू म्हणून दिलेले योगदान आणि उत्कृष्ट मार्गदर्शन कौशल्य लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे. ​या निवडीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या योगपटूंना राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम मार्गदर्शन लाभणार असून, जिल्हा संघ नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ​साक्षी सोनवणे यांच्या या यशाबद्दल आणि निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून, विविध संस्थांकडून व सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्लॅब जीर्ण, इमारत धोकादायक; मौजे सय्यदमिर येथील पोकळे वस्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Image
स्लॅब जीर्ण, इमारत धोकादायक; मौजे सय्यदमिर येथील पोकळे वस्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर   मौजे लोणी सय्यदमिर | प्रतिनिधी   मौजे लोणी सय्यदमिर येथील पोकळे वस्ती परिसरातील प्राथमिक शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून, जीर्ण झालेला स्लॅब, भिंतींची झालेली दुरवस्था आणि इमारतीच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेत परिसरातील लहान विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक व ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.   शाळेच्या इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी जीर्ण झालेला दिसून येत असून, काही भाग कोसळण्याच्या स्थितीत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज या इमारतीत विद्यार्थी आणि शिक्षकांची वर्दळ असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.     विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज   प्राथमिक शाळेत शिकणारी मुले वयाने लहान असल्याने धोकादायक परिस्थितीत स...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरे याला जामीन व जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती - महाराष्ट्र अंनिसतर्फे निषेध

Image
आम्ही वारस विवेकाचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरे याला जामीन व जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती - महाराष्ट्र अंनिसतर्फे निषेध मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तीव्र चिंता बीड प्रतिनिधी :- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी जामीन मंजूर करून, त्याची जन्मठेपेची शिक्षा अपील प्रलंबित असेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गांभीयनि नोंद घेत असून, या निर्णयाबद्दल तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त करत आहोत असे संजय बनसोडे राज्य कार्याध्यक्ष , डॉ सविता शेटे राज्य कार्यवाह विवेक वाहिनी, प्राचार्य कॉ. डी.जी.तांदळे जिल्हा उपाध्यक्ष , बीड शाखेचे कार्याध्यक्ष विजय घेवारे, शाखा प्रधान सचिव अॅड. करुणा टाकसाळ, शाखा कायदा व्यवस्थापन विभाग कार्यवाह अॅड. अंबादास आगे, प्रसिद्धी प्रमुख डॉ संजय तांदळे, व्यसन प्रबोधन आणि संघर्ष विभागाचे कार्यवाह बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. जामीन मंजूर होणे अथवा शिक्षेला...

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; मित्रपरिवाराच्या प्रेमाने अशोक कुताळ भारावले

Image
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; मित्रपरिवाराच्या प्रेमाने अशोक कुताळ भारावले सुंबेवाडी, पिंपळा, लोणी, हातोळण औरंगपूर परिसरातील मित्रपरिवाराकडून मनापासून शुभेच्छा; मान्यवरांकडून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद आष्टी तालुक्यातील पत्रकार अशोक कुताळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुंबेवाडी, पिंपळा, लोणी, हातोळण, औरंगपूर परिसरातील मित्रपरिवार, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आशीर्वादही दिले. यावेळी खासदार निलेश लंके साहेब, खासदार बजरंग सोनवणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे काका तसेच यश भैया आजबे यांनी अशोक कुताळ यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा देत सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावागावातील सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशोक कुताळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या प्रेमामुळे शुभेच्छुक व मित्रपरिवाराचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “आपल...

मुधापुरी येथील मंदिरासाठी डॉ. शिवाजी दिवान यांच्याकडून इनव्हर्टर भेट

Image
​गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील मुधापुरी येथील मंदिरामध्ये विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉ. शिवाजी गोविंदराव दिवान यांच्यातर्फे इनव्हर्टर भेट देण्यात आला आहे. डॉ. दिवान यांच्या या दातृत्वामुळे मंदिरातील दैनंदिन पूजा आणि भजनाच्या कार्यक्रमांमधील विजेचा खोळंबा दूर होणार आहे. ​मंदिर परिसरात आयोजित एका छोट्या कार्यक्रमादरम्यान हा इनव्हर्टर सुपूर्द करण्यात आला. गावातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नेहमीच मदत करण्याची डॉ. दिवान यांची भावना कौतुकास्पद असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ​याप्रसंगी मुधापुरी येथील भजनी मंडळ, स्थानिक ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शिवाजी दिवान यांच्या या सामाजिक आणि धार्मिक कार्याबद्दल मुधापुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

बीड मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी द्या:-डॉ.योगेश क्षीरसागर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Image
बीड मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी द्या डॉ.योगेश क्षीरसागर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी; क्रीडांगणास जमीन देण्याची मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.२५ : तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयांना स्वतंत्र व हक्काची इमारत नसल्यामुळे नागरिकांना महसुली कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बीड परिसरातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या नवीन इमारतींचे बांधकाम आणि दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रीडांगणास आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मंगळवारी (दि.२५) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली. यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्यासह भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, शुभम कातांगळे उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले की, बीड तालुक्यातील अनेक महसूल मंडळ कार्यालयांचे कामकाज सध्या इतर तात्पुरत्या जागांमध्ये सुरू आहे. स्वतंत्र व सुसज्ज इमारतींअभावी शेतकरी, नागरिक आ...

अजित पवार संशयास्पद मृत्यू प्रकरणात एफआयआर का नाही? अभिजीत दिपके यांच्यावर मात्र तत्काळ गुन्हा; डॉ. जितीन वंजारे यांचा सरकारवर निशाणा

Image
अजित पवार संशयास्पद मृत्यू प्रकरणात एफआयआर का नाही? अभिजीत दिपके यांच्यावर मात्र तत्काळ गुन्हा; डॉ. जितीन वंजारे यांचा सरकारवर निशाणा बीड | प्रतिनिधी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरून सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीन वंजारे यांनी राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात काम करणारे अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. “महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का?” असा सवाल उपस्थित करत डॉ. वंजारे यांनी राज्यातील खून, लूटमार, चोरी, अवैध धंदे, वाळू तस्करी, भ्रष्टाचार, निकृष्ट रस्ते, पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील मृत्यूबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात संशय व्यक्त केला जात असताना एफआयआरबाबत तत्परता दिसत नाही; मात्र शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार उघड करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिजीत दिपके यांच...

बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारण्याची सुपारी घेतली काय? ऑक्सिजन ह्युमिडिफायरमधील गढूळ पाण्याचा प्रकार

Image
बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारण्याची सुपारी घेतली काय? ऑक्सिजन ह्युमिडिफायरमधील गढूळ पाण्याचा प्रकार रुग्णाला ऑक्सिजन देताना ह्युमिडिफायरमधील पाणी गढूळ आढळले; पालकमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तक्रार : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २५) बीड जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार संपण्याचे नाव घेत नसून, रुग्णांच्या उपचारातील हलगर्जीपणाच्या तक्रारींमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी वडवणी येथील संध्या सूरज पवार प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य शरीरात राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संसर्ग झाल्याने आतडे तसेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, बीड जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी खाली आणण्यात येत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजन मास्क लावून नेण्यात आले. मात्र, रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा ...

आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी: प्राचार्य साईनाथ माळे

Image
आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी : प्राचार्य साईनाथ माळे बीड | प्रतिनिधी : आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कांसाठी आद्य क्रांतिवीर तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य साईनाथ माळे यांनी केले. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी/कर्मचारी संघटना, बीड आणि बालाघाटचा एकलव्य प्रतिष्ठान, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे आदिवासी समाजबांधव, पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात अमरावती येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर महामानवांना मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी PS...

घरकुल गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी राजेभाऊ गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू

Image
धारूर : प्रतिनिधी — धारूर पंचायत समिती अंतर्गत तेलगाव सर्कलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत झालेल्या घरकुल बांधकामांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे धारूर तालुका सचिव राजेभाऊ नारायण गायकवाड यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल बांधकामातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ८ जून रोजी तक्रार निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड यांनी ३ जुलै रोजी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र, निर्देशानंतरही चौकशी व पंचनाम्याची ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी १० ऑगस्ट रोजी स्मरणपत्र दिले. त्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने अखेर आज, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती धारूर कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून संबंधित कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक मा...

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी

Image
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी बीड (प्रतिनिधी ) बीड तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, उडीद आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने अपुऱ्या पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रेय भरणे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अपुऱ्या पावसामुळे फुलोऱ्यात येणाऱ्या सोयाबीन पिकाचे तसेच बोंड अवस्थेतील कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. अपुरे सिंचन व कमी पर्जन्यवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाअभावी नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची महसूल यंत्रणेमार्फत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात ...

प्रसूतीदरम्यानच्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करा

Image
प्रसूतीदरम्यानच्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करा!  छाया पांचाळ, शेख मुस्कान व संध्या गायकवाड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या निलंबनाची मागणी; जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन बीड : (दि. २४) बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या उपचारादरम्यान कथित हलगर्जीपणाच्या घटना समोर येत असल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणातील दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांची वैद्यकीय सनद रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली. या मागणीसाठी सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. छाया गणेश पांचाळ व शेख मुस्कान यांच्या प्रसूतीदरम्यान मृत्यूच्या घटनांसह वडवणी येथील १९ वर्षीय संध्या सुरज गायकवाड यांच्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या कथित गुंतागुंतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संध्या गायकवाड यांच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य राह...

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : नितीन सोनवणे

Image
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : नितीन सोनवणे अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आहे. या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे. या दुर्घटनेबाबत बोलताना सोनवणे म्हणाले की, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहणे गंभीर बाब आहे. आगीत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून, या घटनेमागे निष्काळजीपणा किंवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या सचिवांनी तातडीने अमरावती येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी...

शाळांमधील व्हिडिओ-फोटो बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन!

Image
शाळांमधील व्हिडिओ-फोटो बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन! नाकर्तेपणा लपविण्यासाठी काढलेला आदेश तातडीने रद्द करा : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २४ ) जिल्हा परिषद शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींनी शाळेच्या वेळेत व्हिडिओ व फोटो काढण्यास बंदी घालण्याच्या आदेशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे यांनी सोमवारी लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जाऊन 'सविनय कायदेभंग' आंदोलन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा हातात घेऊन डॉ. ढवळे यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील परिस्थितीचे व्हिडिओ व फोटो काढले. हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री बीड तथा शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे केली. नेमका आदेश काय? बीड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रणिता गंगाखेडकर यांनी केंद्रप्रमुखांना द...

लऊळ येथील स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक

Image
लऊळ येथील स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक , ग्रामसभेमध्ये गावच्या विविध विकास कामासंदर्भात जनतेने विचारले सरपंचांना प्रश्न,  ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू , सरपंच लक्ष्मण सरवदे वडवणी बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी वडवणी तालुक्यातील लवुळ गावामध्ये या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, लवुळ नं, एक, व लवुळ नं दोन असे दोन गावची या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी ग्रामपंचायत स्वतंत्र विभाजन ग्रामपंचायत करण्यात यावी यासाठी, ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश केला, व ठराव देण्यात यावा यासाठी ग्रामसभा तहखुब करण्यात आली होती,या वेळी ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू असा विश्वास सरपंच लक्ष्मण सरवदे यांनी केला आहे, ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सहकार्य करू गावच्या विविध विकास संदर्भात ग्रामस्थांनी सरपंचाकडे ग्रामसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रस्ताव टाकले , गावामध्ये विविध विकास कामे झाले आहेत त्याची विभागीय चौकशी लावण्यात यावी, यासाठी ग्...

मोक्ष हवा असेल तर काम, क्रोध,लोभ,मत्सर,माया,अहंकार सोडा,आत्महत्या हा मोक्षाचा मार्ग नाही-डॉ. जितीन वंजारे

Image
मोक्ष हवा असेल तर काम, क्रोध,लोभ,मत्सर,माया,अहंकार सोडा,आत्महत्या हा मोक्षाचा मार्ग नाही-डॉ. जितीन वंजारे             काल परवा संभाजी नगर येथील तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर एक घटना घडली,आय फोन मोबाईल चा ई एम आय भरण्यासाठी पैसे द्या असा अट्टाहास 19 वर्षीय मुलगा कुणाल चांदगुडे याने पिता मुरलीधर आई संगीता चांदगुडे यांच्याकडे केला त्याला समजावत असताना कुणालच्या मनात आत्महत्या सारखा वाईट विचार आला आणि जीवन संपवण्यासाठी तो डोंगरावर गेला. त्याला वाचवण्यासाठी तीन तास प्रयत्न झाले पण अखेर आख्ख कुटुंब दरीत पडून संपलं. या हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हळहळला.           मित्रानो जगात अशी कोणतीही समस्या नाही कि ज्याचं समाधान नाही, प्रश्न तिथे उत्तर आहे,माणसाच्या आयुष्यात सुख-दुःख, यश-अपयश, मान-अपमान, लाभ-हानी, जन्म-मृत्यू हे चक्र सतत सुरू असते. कधी परिस्थिती इतकी कठीण होते की माणसाला वाटते आता काहीच उरले नाही,माझे दुःख कधीच संपणार नाही,माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो,मरण आले तर सगळे प्रश्न संपतील,पण इथेच सर्वात मोठा गैरसमज होतो. मरण म्हणजे समस्...

डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे!महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बीडतर्फे अभिवादन

Image
बीड : - अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते आणि संघटनेचे संस्थापक कर्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा बीडच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. 'फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर', 'विवेकाचा आवाज बुलंद करू या' , अशा घोषणा देत त्यांच्या विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ सविता शेटे, राज्य कार्यवाह, विवेकवाहिनी , प्राचार्य कॉ डी जी तांदळे , जिल्हा उपाध्यक्ष आणि शेखर कुमार , 'सा.वादळ'चे संपादक यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीड शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.विजय घेवारे, प्रधान सचिव ॲड करुणा टाकसाळ, जिल्हा महिला सहभाग विभाग सह कार्यवाह शुभांगी कुलकर्णी, अनुसयाताई तांदळे, पोर्णिमा निर्मळ, शाखा कायदा व्यवस्थापन विभाग कार्यवाह ॲड अंबादास आगे, व्यसन प्रबोधन आणि संघर्ष विभागाचे कार्यव...

श्रीक्षेत्र नारायणगडच्या प्रमुख रस्त्याची चाळण; भाविकांची कसरत, लोकप्रतिनिधी-प्रशासनाचे दुर्लक्ष

Image
श्रीक्षेत्र नारायणगडच्या प्रमुख रस्त्याची चाळण; भाविकांची कसरत, लोकप्रतिनिधी-प्रशासनाचे दुर्लक्ष धाकटी पंढरी’कडे जाणाऱ्या नवगण राजुरी–नारायणगड रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा :- डॉ. गणेश ढवळे  बीड : (दि.२२)– बीड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगड देवस्थानाकडे जाणाऱ्या नवगण राजुरी ते नारायणगड प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविक, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची मोठी उपस्थिती असते; मात्र देवस्थानाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीक्षेत्र नारायणगड हे बीड जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे नवगण राजुरी ते नारायणगड हा प...

बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित; हेल्पलाइन नंबर जाहीर

Image
बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित; हेल्पलाइन नंबर जाहीर ​बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यदायी सेवेसाठी आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी 'उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष' आणि मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड जिल्हा यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सुरू करण्यात आले आहे. ​या वैद्यकीय सहायता कक्षामुळे गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत मिळवणे नागरिकांना अधिक सोपे होणार आहे. गरजू रुग्णांना थेट आणि जलद मदत मिळावी यासाठी विशेष हेल्पलाइन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, बीड ​हेल्पलाइन नंबर: 9657355113 ​जिल्ह्यातील गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय मदतीसाठी अथवा उपचारासंबंधित माहितीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा; वैद्यकीय सनद रद्द करा! - बाजीराव ढाकणे

Image
दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा; वैद्यकीय सनद रद्द करा! - बाजीराव ढाकणे  नवविवाहितेचे गर्भाशय गमावण्याच्या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची बाजीराव ढाकणेंची मागणी बीड | प्रतिनिधी बीड जिल्हा रुग्णालयातील नवविवाहित महिलेच्या उपचारासंदर्भात समोर आलेल्या गंभीर प्रकरणाची तातडीने स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, दोष सिद्ध झाल्यास संबंधितांना सेवेतून बडतर्फ करावे आणि सक्षम वैद्यकीय प्राधिकरणामार्फत त्यांची वैद्यकीय सनद रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. नवविवाहित महिलेचे गर्भाशय गमावण्याची वेळ आल्याच्या वृत्तामुळे बीडच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची केवळ अंतर्गत चौकशी न करता जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक व स्वतंत्र तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीमार्फत कालबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्...

निर्भीड पत्रकार संघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी शेख फहीम सलीम यांची निवड

Image
निर्भीड पत्रकार संघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी शेख फहीम सलीम यांची निवड बीड प्रतिनिधी निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पत्रकारांच्या न्याय हत्कासाठी लढणारी निर्भीड संघटना असून संघटनेच्या बीड तालुका अध्यक्षपदी शेख फहीम सलीम यांची निवड संस्थापक अध्यक्ष रुचिता मलवारी, यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र सिंग ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सोळंके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सां. दैनिक सिटीजनचे शहर प्रतिनिधी शेख फहीम सलीम यांचे पत्रकारितेतील योगदान पाहता बीड अध्यक्षपदी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवणे, व संघटना बांधणीसाठी योगदान देत निर्भीड पत्रकार संघ मजबूत करणे हाच प्रमुख उद्देश आपल्यासमोर असल्याचे यावेळी शेख यांनी म्हटले. या निवडीच्या वेळी वरील मान्यवरांसह जिल्हाातील तथा राज्यातील पदाधिकारी यांनी शेख यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे बीड तालुक्यातील पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उपस्थित मान्यवर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र सिंग ढाका जिल्हा...

रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांना निवेदन सादर

Image
बीड दि.१५ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड, तर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगार प्रतिनिधी वैजनाथ पिराजी पतंगे यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत याकरिता 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. चौथ्या दिवशी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर लक्ष वेधून तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.     त्या वर त्यांनी घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना लवकरच किमान वेतन व सोई सुविधाचा लाभ मिळेल तर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचा विषय पहिल्यांदा माझ्या समोर आला आहे. याची माहिती घेऊन तेथील वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.         जर दिनांक:- 20/08/2026 पर्यंत न्याय मिळवून दिला नाही तर ...

४ हजार पावले माती पाण्यासाठी,२१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’

Image
४ हजार पावले माती पाण्यासाठी,२१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ मुंबई, दि. १९ : “एक पाऊल तुमचे, एक थेंब भविष्यासाठी!” या संदेशासह महाराष्ट्र आता पाण्यासाठी चालणार आहे. २१ ऑगस्टला ३ किलोमीटर म्हणजेच सुमारे ४ हजार पावले जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी टाकली जाणार असून, महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही केवळ तीन किलोमीटरची चाल नसून, महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी उचललेली चार हजार पावले ठरणार आहेत. मुंबईतील या मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. राज्यभरातही जिल्हानिहाय वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना ३ किलोमीटरचे अंतर चालायचे आहे. साधारणपणे ३ किलोमीट...