" वाचाल तर वाचाल" तर्फे जागतिक पुस्तक दिन उत्साहात संपन्न



129 पुस्तकाचे दोन संच वाचनाकरिता वितरित. 

बीड (प्रतिनिधी) सोशल मीडिया व इंटरनेटच्या मायावी जाळ्यात अडकून विद्यार्थी वाचनापासून; खेळाच्या मैदानापासून दूर राहत आहेत. लहानपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाने 2016 पासून बीड शहरात व परिसरात 44 मोफत वाचनालये सुरू करून 3200 पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे.आज दिनांक 23/ 4/ 2026 रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मौजे वरवटी तालुका जिल्हा बीड येथील 44 व्या केंद्रात 2 ऱ्या फेरीतील 41 पुस्तकांचा संच वाचण्याकरिता ॲड राजेश शिंदे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.एम. भोले सर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. संचातील पुस्तके वितरणाची जबाबदारी ॲड राजेश शिंदे यांनी तर प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप चालवीत असलेल्या मोफत शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 88 पुस्तकांचा संच वर्गशिक्षिका विशाखा वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. सदरील पुस्तकांचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा अशी विनंती वाचाल तर वाचाल वाचनालयाचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे यांनी केली याप्रसंगी अध्यक्ष जी.एम भोले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माणसाच्या जीवनात एक चांगले पुस्तक काय बदल घडवून आणू शकते हे गुरुवर्य केळुसकर गुरुजींनी भीमरावांच्या सत्कार प्रसंगी गौतम बुद्धाचे जीवन चरित्र पुस्तक भेट दिलेला प्रसंग सांगून व त्या जीवन चरित्राचा सखोल वाचन, चिंतन,मनन भीमरावांनी केले व पुढील जीवनात केलेले महान कार्य व ज्ञानप्राप्ती व देशाकरिता केलेले अतुलनीय कार्य सर्वांना ज्ञात आहे म्हणून पुस्तक वाचन म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर विचार प्रगल्भता वाढविणे व जीवनात प्रगती करण्यास उत्तेजन होय डॉ.बाबासाहेबांचा बहुमोल विचार प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजेत की पुस्तकाने मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही. वाचन संस्कृती वाढविण्याकरिता पालकांनी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून थोर शास्त्रज्ञ, समाजसेवक, साने गुरुजी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे, पर्यावरणावरील एक तरी पुस्तक आपल्या पाल्याच्या हातात दिले पाहिजे व त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे की शरीर स्वास्थ्य सांभाळून पुस्तकाचे वाचन करून "वाचाल तर वाचाल." 
कार्यक्रमास आयु. जी एम. भोले,प्रा.श्रीराम जाधव. ॲड राजेश शिंदे,ॲड मनोज वाघमारे, ॲड तेजस वडमारे,एस. एस सोनवणे, विशाल गायकवाड यांनी वाचाल तर वाचाल च्या मित्र नगर येथील मुख्य केंद्राला भेट दिली, त्या सर्वांचे वाचाल तर वाचाल तर्फे धम्मपद , (प्रा.डॉ मनोहर सिरसाट लिखित)महामानव व (कवयित्री माया दिवाण) यांचे नवी पहाट हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. ॲड तेजस वडमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी