वृक्षारोपणातून जिजाबाई जगतकर यांच्या अस्थी विसर्जनास अनोखी श्रद्धांजलीजगतकर कुटुंबीयांचा आदर्श पायंडा



परळी प्रतिनिधी – स्मृतीशेष मातोश्री जिजाबाई शंकरराव जगतकर यांच्या पुण्यानुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम आज, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी परळी येथे श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

राजमाता जिजाऊ मुलींच्या वस्तीगृहाच्या वॉर्डन तसेच दलित मित्र पुरस्कारप्राप्त स्व. शंकरराव राजाराम जगतकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे वृद्धापकाळाने ९८ व्या वर्षी म्हणजे २७ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले होते.

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जगतकर कुटुंबीयांनी एक आदर्श उपक्रम राबवत वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन केले. सकाळी ‘रक्षा सावडणे’ या विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर चांदापूर येथील संत चोखामेळा सोसायटीतील शेतजमिनीत, स्व. शंकरराव जगतकर यांच्या समाधीजवळ वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन करण्यात आले.

दुपारच्या सत्रात पुण्यानुमोदन व जलदान विधी तसेच धम्मदेशना कार्यक्रम विधीचार्य आनंद तूपसमुद्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला अँड. अनंतराव जगतकर,अरुण जगतकर, अशोक जगतकर, राजाभाऊ जगतकर, बहिणाबाई कांबळे तसेच सुना, नातवंडे, आप्तेष्ट, नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. विनोद जगतकर, प्रा. डि.जी. वाघमारे, गौतम मुंडे बालाजी जगतकर व मान्यवरांनी स्व. जिजाबाई जगतकर यांच्या कार्याचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्रिशरण, पंचशील व शरनातयाने तसेच भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी