रोहितळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; 'सर्वधर्मसमभावा'चे दर्शन
गेवराई प्रतिनिधी : तालुक्यातील रोहितळ येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावात पाहायला मिळालेला. जयंतीनिमित्त भीमगीत संगीत रजनी आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उत्सवादरम्यान गावातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे सामाजिक सलोख्याचे आणि एकतेचे दर्शन घडले.
गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रोहितळमधील हा जयंती सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.
Comments
Post a Comment