आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

कोल्हापूर स्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यास परिवारासह जीवे मारण्याची धमकी दिली.
बीड (दि 23): बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरस्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरुन आई,बहिण,आणि पत्नीचा उल्लेख करुन,अतिशय अश्लील- अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांची चौकशी करुन अटक करावी आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी; अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांना बीड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनामध्ये तीव्र निषेध नोंदवून म्हटले आहे की,
" शिवाजी कोण होता" हे पुस्तक 38 वर्षांपुर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहीले आहे.मराठी सहीत अन्य भाषांमधील लाखों प्रती वाचकांनी वाचलेल्या आहेत.मात्र,या पुस्तकाचे शिर्षक शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करीत असल्याचे म्हणत पुस्तकाचे वितरण,विक्री करीत असलेले प्रशांत आंबी यांना बेइज्जत करुन जीवे मारण्याची आमदाराने धमकी देणे म्हणजे चक्क गुंडगिरीच आहे. 
तद्वतच,या धमकी दरम्यान,या आमदाराने "गोविंद पानसरेचे कसे हाल केले,तसेच तुझे सुद्धा करतो" असे म्हटले आहे. यावरून,गोविंद पानसरे यांच्या खुनामध्ये या आमदाराचा देखिल सहभाग असावा,अशी रास्त शंका येते.करिता,त्या केस मध्ये सुद्धा यांना सहआरोपी करवून घ्यावे,रितसर चौकशी करावी.यापूर्वीही,
सदर आमदाराने आमदार निवासातील 
कैन्टीन मधील सामान्य कामगाराला शिवीगाळ करुन मारहाण केलेली आहे.
कायदेमंडळाचा सदस्य असलेल्या व्यक्तीनेच कायदा पयदळी तुडविला असुन दहशत निर्माण केल्यामुळे या प्रकरणात चौकशी करुन
गुन्हा नोंदवावा,अटक करावी,त्यांची आमदारकीची पात्रता रद्द करावी,आणि प्रशांत आंबी व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सक्षम संरक्षण देण्यात यावे,या मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ नामदेव चव्हाण, राज्य कौन्सिल सदस्य -कॉ भाऊ प्रभाळे,कॉ ज्योतिराम 
हुरकुडे ,प्राचार्य कॉ राजकुमार कदम,-
किसान सभेचे अध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे,
कॉ भिमराव चव्हाण वकील, कॉ फिडेल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, कॉ रामदास कदम,अझहर शेख, कॉ भिमराव जगताप, कॉ यासीन शेख,कॉ अजय हुन्बे, यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी