धानोरा जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या काळे मंथन स्पर्धा परीक्षेत बीड जिल्ह्यातून प्रथम तर, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत द्वितीय क्रमांकाची मानकरी

धानोरा जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या काळे मंथन स्पर्धा परीक्षेत बीड जिल्ह्यातून प्रथम तर, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत द्वितीय क्रमांकाची मानकरी

 धानोरा जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेच्यात दुसऱ्यांदा मानाचा तुरा 

    कु.आर्या काळे सह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन-शुभेच्छांचा वर्षाव
  आष्टी ( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
          नुकत्याच मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या .या परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . त्याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या प्रवीण काळे या विद्यार्थिनीने बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर, राज्यस्तरातून द्वितीय क्रमांक पटकावून मानकरी ठरली .
  तर प्रांजल गोरक्षनाथ आडागळे तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक, असलबा असलम सय्यद तालुकास्तरावर चौथा क्रमांक, रुद्र केशव उदावंत केंद्रात प्रथम क्रमांक, गीतांजली संदेश शेळके केंद्रात द्वितीय क्रमांक, शिवराज राहुल शेळके केंद्रात प्रथम क्रमांक, रणवीत राजेंद्र गव्हाणे केंद्रात द्वितीय क्रमांक, अथर्व पंढरीनाथ गायकवाड केंद्रात तृतीय क्रमांक, अनन्या महेश लोहार केंद्रात प्रथम क्रमांक, संस्कार दत्तू लगड केंद्रात द्वितीय क्रमांक, विश्वजीत दासू शेलार केंद्रात द्वितीय क्रमांक व राजवीर कपिलदेव गोस्वामी केंद्रात तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांनी केंद्रात व तालुका स्तरावर मंथन स्पर्धा परीक्षेत क्रमांक पटकावून यशस्वी झाले .
    कु.आर्या काळेने पुन्हा धानोरा जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेच्यात दुसऱ्यांदा मानाचा तुरा खौवला. कु.आर्या काळेने मंथन जनरल नॉलेज राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळेचं नाव रोशन केल्याने सर्व स्तरातून कु.आर्या काळे सह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदननाचा वर्षाव होत असून यामध्ये धानोरा जिल्हा परिषद शाळेत कु.आर्या काळे व वडील प्रवीण काळे व यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
    मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेत कु.आर्या काळे सह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक /शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून कु.आर्या प्रवीण काळेने मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत दुतीय क्रमांक पटकावल्याने व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे गटशिक्षणाधिकारी /शिक्षण विस्तार अधिकारी /केंद्रप्रमुख मुख्याध्यापक ,/ शिक्षक वृंद/ सर्व शिक्षिका/शालेय व्यवस्थापन समिती/शैक्षणिक / 
सामाजिक/राजकीय/ मित्रपरिवार/पालक वर्ग सर्व स्तरातून कु.आर्या प्रवीण काळे सह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी