बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा


बीड | प्रतिनिधी
तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.
भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बीड तालुकाध्यक्ष राजेंद्र ससाने बीड तालुका कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्रसार, सामाजिक परिवर्तन आणि मानवकल्याणासाठी तरुण पिढीने पुढे येण्याचे आवाहन केले. हा सोहळा धम्मनिष्ठा, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी