मुगगाव ग्रामरोजगार सेवकाकडे जादूची कांडी का? एकच मजूर अनेक ठिकाणी कसा? – संजय खोटे


पाटोदा (प्रतिनिधी) मुगगाव येथील मनरेगा कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संजय खोटे यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.खोटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गाडेवस्ती शाळा ते अंतापूर शिवरस्ता या मनरेगा कामावरील मस्टरमध्ये नोंद असलेला एकच मजूर त्याच दिवशी आणि त्याच तारखेला पाटोदा तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, तोच मजूर त्याच दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखतावर साक्षीदार म्हणूनही उपस्थित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.याशिवाय, दुसरा एक मजूर एकाच तारखेला आणि एकाच वेळेत दोन वेगवेगळ्या कामांच्या मस्टरमध्ये नोंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, आणखी एका मजुराचे नाव त्याच कामाच्या दोन स्वतंत्र मस्टरवर असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.तिसरा मजूर संबंधित दिवशी विविध शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओ), जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे उपस्थित असल्याचे पुरावे असल्याचा दावाही करण्यात आला आहे.या सर्व बाबी मनरेगा नियमांच्या विरोधात असून, संबंधित मस्टर, हजेरी नोंदी, कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संजय खोटे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी