MPSC पेपरफुटीत नंदुरबार कनेक्शन; दोषींवर कठोर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी



शहादा प्रतिनिधी: MPSC औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
               महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाबाबत विद्यार्थ्यामध्ये व स्पर्धा परीक्षेची तयारी करणान्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. सदर प्रकरणामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील हजारो विद्यार्थी अनेक वर्षापासून मेहनत, वेळ आणि आर्थिक संसाधने खर्च करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत जर प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप खरे ठरले, तर प्रामाणिकपणे परीक्षा देणान्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन त्यांच्या भवित्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे सदर कथित पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष, सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. चौकशीमध्ये दोषी आढळणान्या कोणत्याही व्यक्तींवर, अधिकारी किंवा संबंधित घटकावर कोणताही दबाव अथवा राजकीय हस्तक्षेप न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच, या प्रकरणामुळे विद्यार्थ्याच्या परीक्षा प्रक्रियेवर निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी संपूर्ण वस्तुस्थिती पारदर्शकपणे जनतेसमोर मांडण्यात यावी.या पेपरफुटीत नंदुरबार येथील कौटील्य अकॅडमी चे कनेक्शन समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी ,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Comments