रोजंदारी मजदुर सेनेच्या दणक्याने औष्णिक विद्युत केंद्र परळीतील कंत्राटदाराविरुद्ध विविध कामगार कायद्यांतर्गत खटले दाखल
परळी दि.२९ ( प्रतिनिधी ) रोजंदारी मजदुर सेनेच्या दणक्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व विभागप्रमुखांच्या अधीनस्थ कंत्राटदारावर विविध कामगार कायद्यांतर्गत मा. प्रथम न्यायदंडाधिकारी परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या न्यायालयात खटले दाखल करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांचे बेकायदेशीर पिळवणूक करणाऱ्या मुख्य अभियंता यांच्या आस्थापनेतील सर्व विभाग प्रमुखांच्या अधीनस्थ कंत्राटदार व संबंधित विभाग प्रमुख मागील 35 वर्षापासून किमान वेतन व अनुषंगित लाभ न देता कंत्राटी कामगारांचे शोषण करत आहेत याकरिता सरकारी कामगार अधिकारी बीड यांच्यामार्फत निरीक्षण करावे याकरिता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर तब्बल 11 दिवस उपोषण केले होते त्या अनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी बीड सुधाकर कोनाळे यांनी दिनांक २०/ ०८/ २०२५ रोजी औष्णिक विद्युत केंद्रातील आस्थापनेत युनिट नं. ६/७/ ८ येथे निरीक्षण केले होते. परंतु अंतिम अभिप्राय संघटनेस कळविला नव्हता त्यामुळे मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल राज्यमंत्री कामगार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे त्यांच्या दालनात दिनांक:- ०२/ ०६/२०२६ रोजी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी संघटनेच्या वतीने लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने शि.शा. बादल सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार आयुक्त, कामगार भवन यांचे कार्यालय, ग्रामीण विभाग, मुंबई. यांनी कामगार उपायुक्त छत्रपती संभाजी नगर यांना एका पत्राद्वारे क्रमांक: काआ/ ग्रा.वि/स.स./२०२६/कार्या-११ दिनांक : २० जुलै २०२६ परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळत नाहीत त्याचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा असे कळवले त्यावर सरकारी कामगार अधिकारी बीड अ.अ. देशमुख यांनी जा.क्र. सकाअ/बीड/३३३/२०२६ दिनांक:- २०.०७.२०२६ रोजी मा. कामगार उपायुक्त छत्रपती संभाजी नगर विभाग छत्रपती संभाजी नगर यांना औष्णिक विद्युत केंद्र आस्थापनेत युनिट नं. ६/७/८ तेथे निरीक्षण करून आस्थापना मालका विरुद्ध विविध कामगार कायद्यांतर्गत मा. प्रथम न्याय दंडाधिकारी परळी वैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड यांचे न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत असे कळवून त्याची प्रत संघटनेस ईमेल केली आहे. संघटनेच्या माध्यमातून सततच्या पाठपुराव्या केल्यामुळे ३५ वर्षात पहिल्यांदाच औष्णिक विद्युत केंद्रात कामगार विभाग बीड यांनी निरीक्षण करून विविध कामगार कायद्यांतील तरतुदीनुसार खटले दाखल केले आहेत, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment