पारधी समाजातील महिलेवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला ; विनयभंग, मारहाण, लूट आणि बलात्काराच्या प्रयत्नचा फसला
पारधी समाजातील महिलेवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला ; विनयभंग, मारहाण, लूट आणि बलात्काराच्या प्रयत्नचा फसला
गुन्हा नोंद होऊनही आरोपी मोकाटच तलवाडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच, पारधी समाजातील एका सुशिक्षित महिलेवर अमानुष जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एक हात फ्रॅक्चर व अंगावर पाठीवर पायावर मारहाणी वन मोठ्या प्रमाणावर आहेत.रीता प्रभाकर भोसले यांनी आपल्यावर बेदम मारहाण, अंगावरील ब्लाउज देखील फाडण्यात आला, विनयभंग, रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसकावून घेणे, तसेच जिवे मारण्याचा आणि बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला त्या लोकांची नावे
सदाशिव रतन काळे,नितीन सदाशिव काळे,गोरख सुरेश भोसले,गोरख सदाशिव काळे,बालाजी सखाराम काळे,संतोष सखाराम काळे,रोहित कालिदास भोसले,कालिदास रामदास भोसले,पद्माबाई सुरेश भोसले,रेखाबाई सखाराम काळे,लक्ष्मीबाई गोरख काळे केला आहे. या घटनेनंतर त्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि शरीरावर गंभीर मारहाणीच्या जखमा असल्याचे सांगण्यात आले.
पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करून अंगावरील कपडे फाडले, विनयभंग केला आणि सोबत असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच जिवे मारण्याचा आणि बलात्कार करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. जीव वाचवण्यासाठी उसाच्या शेतात पळ काढल्यामुळे आपण बचावल्याचा दावा त्यांनी केला.
घटना सुरू असतानाच दोन स्कॉर्पिओ वाहने घटनास्थळी आल्याने आरोपींना पोलीस आल्याचा संशय निर्माण झाला आणि तेथून त्यांनी पळ काढल्याचेही महिलेने सांगितले. या प्रकरणात राजापूर गावच्या पोलीस पाटलांच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार हल्ला करणारे यापूर्वी एम.पी.डी. कायद्याअंतर्गत जिल्ह्यातून हद्दपार होते . अशा गंभीर होण्याची आरोपी आहेत. त्यांनी दहशत व हल्ले करण्याचे काम सुरू केले आहे. हे सर्व गंभीर आरोप असूनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक झाली नसल्याने तलवाडा पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या रीता भोसले यांच्या हाताला फ्रॅक्चर असून पायासह संपूर्ण शरीरावर गंभीर मारहाणीच्या जखमा आणि सूज असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. मारहाण करणारे सर्वजण हे मोकाट पणे राजरोसपणे संपूर्ण गावभर तालुका भर फिरत आहेत.
Comments
Post a Comment