लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी- अनिल तुरूकमारे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी- अनिल तुरूकमारे
बीड | प्रतिनिधी

केज येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहार व फसवणुकीच्या आरोपांची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल तुरूकमारे यांच्या कडुन करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, सुतगिरणीमध्ये ४६४ विद्यार्थी-विद्यार्थिनींची जातवैधता प्रमाणपत्रे परस्पर सभासद म्हणून वापरून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तत्कालीन चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

याशिवाय, सुतगिरणीने वस्त्रोद्योग विभागाचे सुमारे ३५ कोटी रुपये आणि समाजकल्याण विभागाचे १४ कोटी रुपये घेतल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला असून, या निधीच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीबाबत संबंधित विभागांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे चौकशीमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री सचिवालयाकडे करण्यात आली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी