जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ' धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत 'यांच्या प्रतिमेला लिंबागणेशमध्ये 'जोडे मारो' आंदोलन
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ' धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत 'यांच्या प्रतिमेला लिंबागणेशमध्ये 'जोडे मारो' आंदोलन
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचाही निषेध :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- (दि.२३) दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तसेच आंदोलनकर्त्यांबाबत सदाभाऊ खोत यांनी 'दहशतवादी ' संबोधुन करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज दि.२३ गुरुवारी लिंबागणेश ता.बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली 'आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या", "दिल्ली पोलिस मुर्दाबाद", "विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा" ' सदाभाऊ नव्हे हा तर भाडखाऊ 'अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
या आंदोलनातसेवा सोसायटीचे चेअरमन रविबापू निर्मळ, अँड.गणेश वाणी, सुरेश निर्मळ ,शिवशक्ती भिमशक्ति विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, संतोष भोसले, सर्पमित्र अशोक जाधव, ज्ञानेश्वर कुदळे,सुंदर येडे,सोमीनाथ आमटे, सिताराम थोरात, रामहरी चाळक, गुलाब कांबळे,नाना निर्मळ, अमोल निर्मळ, अशोक गोंडे, रामचंद्र मुळे आदी सहभागी होते.
"विद्यार्थ्यांवरील लाठीमार लोकशाहीला काळिमा" – डॉ. गणेश ढवळे
लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना व विद्यार्थ्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीमार हा लोकशाही मूल्यांवर आघात असून, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.
प्रमुख मागण्या
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
जंतरमंतर येथील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी.
दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
आंदोलनकर्त्यांबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून संबंधितांनी दिलगिरी व्यक्त करावी.
Comments
Post a Comment