सोमवार च्या नियोजित ' जनक्रांती विद्यार्थी -विद्यार्थिनीं-पालकांच्या रॅली ' ऐवजी मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत 'शिक्षणा' संबंधी निवेदन देणार




बीड प्रतिनिधी. : - बीड शहरातील शिक्षणप्रेमी सामाजिक-राजकिय कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनाला समर्थन व तिथे आंदोलक मुलां-मुलींना झालेली अमानुषपणे मारहाण अन् भयंकर अत्याचारांचा निषेध करण्यासाठी दि २७ जुलै,सोमवार रोजी किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय,बीड अशी नियोजित ' रॅली ' स्थगित करुन ; त्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर' निर्धार सभा घेवून, दर्जेदार शिक्षण, पारदर्शक परीक्षा, वेळेत रास्त निकाल,शिक्षण -धोरण २०२० रद्द करणे ,'एन.टी.ए.' बरखास्त करणे,एन.टी.ए.चे चेअरमन डॉ. प्रदीपकुमार जोशी यांचे कडून वर्तमान पेपर फुटी व निकालातील घोटाळ्यांचा 'तपास' काढून घेणे व सर्वौच्च न्यायालयाचे जेष्ठतम सेवानिवृत्त न्यायमुर्तीं च्या अध्यक्षतेखाली वर्तमान व अगोदरच्या पेपरफुटी,निकालातील घोटाळे इत्यादीचा तपास करवून घेणे, आंदोलक विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला यांना ज्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलिसांच्या वेषात असलेले गुंड, मवाली यांचेवर गुन्हे दाखल करणे;
शेकडो गुंडांना पोलीसांच्या लाठया देवून ज्या अधिका-यांने बेकायदेशीर काम केले,त्यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करणे अशा मागण्यांचे निवेदन देशाच्या मा. महामहीम राष्ट्रपती, 
मा सरन्यायाधिश, सर्वौच्च न्यायालय,
देशाचे मा.पंतप्रधान,
तसेच,
मा.गृहमंत्री,
राज्याचे मा.गृहमंत्री तथा मुख्यमंत्री,
यांना पाठविण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डी जी तांदळे यांनी दिली आहे.
दिल्लीतील आंदोलन मागे घेतल्याच्या पार्श्वभुमीवर प्राचार्य कॉ डी जी तांदळे यांनी तातडीने बैठक आयोजित केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नियोजित 'रॅली' ऐवजी 'निदर्शने' करुन शिक्षण क्षेत्रातील मुलभुत प्रश्न खाजगीकरणामुळे कायम असल्याचे अधिरेखीत करुन त्या संबंधाने व्यापक जनजागृती करण्याची निकड व्यक्त केली.
उपरोल्लेखीत महत्वाच्या मागण्यांचे निवेदन देणे.
 तद्वतच,
शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा ही समस्यांची अजिबात उकल नाही,हे ठाम मत मांडले. चर्चेमध्ये कॉ नामदेव चव्हाण,प्रा.सुशिला मोराळे, शेख शफीक,परवेझ कुरेशी, बाजीराव ढाकणे, अशोक येडे,राजेंद्र आमटे,कॉ सुहास जायभाये, नितीन जायभाये,अमजद कुरेशी,किशोर कुलकर्णी, शेख पाशाभाई,कॉ अभिषेक शिंदे,इलियास बागवान,अविनाश डरफे,नारायण शिंदे,साजेद कुरेशी यांनी सहभाग घेतला. 
बैठकीचे प्रास्ताविक व संचलन प्राचार्य डी जी तांदळे यांनी केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी