जंतर-मंतर युवा आंदोलकावरील भ्याड हल्ल्याचा निषेध - प्रा. सुशीलाताई मोराळे
. बीड प्रतिनिधी दिनांक 24 जुलै :- नीट पेपर फुट प्रकरणात केंद्रातील सरकारचा गलथान कारभार जिम्मेदार असून गेली 24 दिवसापासून काक्रोच पार्टीचे अभिजीत दिपके व पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूंग यांनी प्राणांतिक उपोषण केले आहे. या आंदोलनाला हजारो तरुणांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलकाची दररोज वाढत असलेली संख्या ही सरकारच्या अपयशामुळेच वाढत आहे. त्यामुळे बिथरलेली पोलीस यंत्रणेने अश्रूधूर, पाण्याचे फवारे आणि लाठी चार्ज करून हिडीस प्रदर्शन केले त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करण्यासाठी किसान संघर्ष समिती, जनहित अभियान, ओबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय समाज पक्ष, युवक क्रांती दल, हमाल मापाडी संघटनेसह कामगार संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकावरील गुन्हे परत घ्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. सुशीलाताई मोराळे, अमर शेख, पंडित तुपे, संगमेश्वर आंधळकर, शेरजमा पठाण, प्रा. अण्णासाहेब मतकर, अंकुश खाडे, बबन आंधळे,काॅ. इकबाल पेंटर ,माजी आमदार भाई जनार्दन तुपे,बबन वडमारे डॉ. संजय तांदळे, सुभाष लोणके, मधुकर केदार, बाजीराव ढाकणे,भाई अ.भ. लोंढे, संतराम घोडके पाटील, डॉ. डी. जी. तांदळे, वजीर शेख,बाळासाहेब पवळ, देविदास चव्हाण, शेख शफिक भाई, मौलाना आझाद विचार मंचचे रिजवान पठाण, सुग्रीव केदार, राजेंद्र सानप, मीनाक्षी देवकते, ज्योती वडमारे, विद्या राठोड, शारदा अडागळे, राजेंद्र दराडे, अनंत सारुक, दादासाहेब मुंडे, इलियास इनामदार इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment