बीडमधील बालेपीर दर्गाजवळील रखडलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला; डॉ. योगेश क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
बीड प्रतिनिधी :-बीड शहरातील अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील बालेपीर परिसरातील दर्गाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला रस्ता अखेर वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.
भाजपा युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले. बुधवारी (दि. २९) डॉ. क्षीरसागर यांनी स्वतः रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवून हा मार्ग नागरिकांच्या सेवेत खुला केला.
या महामार्गावरील रस्ता बंद असल्याने वाहनधारकांना व स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्ता सुरू झाल्याने वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला असून, परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment