भालचंद्र विद्यालयात शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
भालचंद्र विद्यालयात शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम :- – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :- (दि. २८) :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल २५ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज मंगळवारी (दि. २८) उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. मुकुंद मोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, पत्रकार हरिओम क्षीरसागर,प्राचार्य दत्तात्रय कवडे आणि वरिष्ठ लिपिक शिवाजी जाधव उपस्थित होते.
यावेळी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कु. अंकिता कुंडलिक मांडवे, चि. श्रेयस लक्ष्मण कदम, सय्यद अल्मिन अजीम, कु. श्रुती मल्हारी ढास, कु. अनुजा दिनकर हिंदोळे,कु. स्नेहल बन्सी निर्मळ, श्री आनंद बारगजे तसेच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतील कु. सय्यद अलविना अजीम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची उत्कृष्ट तयारी करून देणारे शिक्षक दादासाहेब सुपेकर, गणेश घरत, चंद्रकांत मुळीक आणि श्रीमती संध्या जाधव यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ.गणेश ढवळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले. भालचंद्र विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा सातत्याने कायम राखली असून ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी याच जिद्दीने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून अधिक मोठे यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल रसाळ यांनी केले. प्रास्ताविक गणेश आजबे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामहरी दाभाडे सर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment