अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा द्या-स्नेहा वंजारे/दीपके
अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा द्या-स्नेहा वंजारे/दीपके
जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन, दिल्ली पोलिसांवर भरोसा नाही-डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी:- दिनांक 24 रोजी अभिजित दिपके यांची बहीण स्नेहा वंजारे/दिपके आणि भाऊजी डॉ जितीन वंजारे यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अभिजित दिपके यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस संरक्षण देण्याबाबत राष्ट्रपतीना निवेदन दिले. दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्याविषयी संवेदना बाळगून अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून स्टॅन्ड घेतला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली याला भारतातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत विद्यार्थ्यांसाठी एक नवी चळवळ निर्माण केली, लाखो विद्यार्थी जंतर-मंतरवर तसेच देशभरामध्ये विविध शहरांमध्ये एकवटले आहेत पोलीस प्रशासन त्यांना अमानुष हनुमान करत आहे, लाठी चार्ज करत आहे, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, सरकार दडपशाही करत आहे आणि म्हणून अभिजीत दिपके यांनाही हानमार, लाठीचार्ज, जीवाला धोका होण्याची भीती आहे. दिल्ली पोलिसांवर आमचा भरोसा नाही, त्यामुळे अभिजीत दिपके यांना महाराष्ट्र पोलीस संरक्षण देण्यात यावे असे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना अभिजीत दिपके यांच्या भगिनी सौ.स्नेहा जितीन वंजारे/दिपके आणि त्यांचे भाऊजी डॉक्टर जितीन वंजारे यांनी दिले आहे.
अभिजीत दिपके यांची बहीण स्नेहा वंजारे / दीपके यांनी सांगितले की अभिजित यांना मायग्रेनचा त्रास असून त्याची शुगर कधी कधी कमी होते असल्याचे समजत आहे.त्यांना उपोषणात अस्वस्थ वाटण्याची दाट शक्यता आहे, मागे पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांचा गळा दाबण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यांना डोक्यामध्ये मार लागल्यास गंभीर इजा पोहोचू शकते त्यांचा कुटुंबाशी संपर्क होत नाही त्यामुळे अख्ख कुटुंब चिंतेत असून दिल्ली पोलिसांवर आमचा अजिबात भरोसा नाही.त्यामुळे ते महाराष्ट्राचे रहिवासी असल्याकारणाने त्यांना महाराष्ट्र पोलीस संरक्षण दिल्लीमध्ये देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी बीड मार्फत राष्ट्रपती महोदयांना विनंती अर्ज करण्यात आलेला आहे.
Comments
Post a Comment