दुर्गम काचरवाडीच्या ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्ञानेश्वर ची NEET मध्ये घवघवीत कामगिरी; 590 गुण मिळवत संपादन केले उल्लेखनीय यश


केज प्रतिनिधी :- केज तालुक्यातील विडा परिसरातील मौजे काचरवाडी या अतिशय दुर्गम व डोंगराळ गावातील विद्यार्थी ज्ञानेश्वर दादाराव पडवळे याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या NEET–2026 परीक्षेत 590 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे काचरवाडी गावासह संपूर्ण विडा परिसरातून ज्ञानेश्वरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल ईडा शिक्षण संस्था, विडा यांच्या वतीने ज्ञानेश्वरचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव धैर्यशील भाऊ देशमुख, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, केंद्रप्रमुख सुभाष सारुक, सुनिता बांगर मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौरवाडी , तसेच दत्तात्रय वरपे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्ञानेश्वरचे वडील दादाराव तुळजीराम पडवळे आणि आई चंद्रकला दादाराव पडवळे हे ऊसतोडणीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी, डोंगराळ परिसरातील मर्यादित सुविधा आणि कठीण परिस्थिती असूनही ज्ञानेश्वरने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे ज्ञानेश्वरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काचरवाडी येथे झालेले आहे. या यशामुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि दर्जा कमी नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. योग्य मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द याच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
गावकऱ्यांनी ज्ञानेश्वरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे यश काचरवाडीसारख्या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे मत लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी