मा. ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा परळीत लवकरच उभारणार – दीपक देशमुख
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा परळी शहरात लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती परळी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक देशमुख यांनी दिली.
या संदर्भात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन पुतळा उभारणीच्या प्रस्तावाबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. प्रस्तावासंदर्भातील माहिती देण्यात आली असून, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच पुतळ्याचे भूमिपूजन व त्यानंतर अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे दीपक देशमुख यांनी सांगितले.
सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्था आणि व्हीएमडी बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव आणि त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पुतळा उभारणीसंदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कामगार नेते गौतम आगळे हे देखील उपस्थित होते.
याशिवाय, अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही दीपक देशमुख यांनी दिली. पुतळा उभारणीसाठी आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
दरम्यान, या उपक्रमामुळे परळी शहरात विकासाभिमुख नेतृत्वाचा सन्मान करण्याबरोबरच सामाजिक प्रेरणा देणारे एक महत्त्वपूर्ण स्मारक उभारले जाणार असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment