विद्यार्थ्यांच्या अंदोलनाला पाठींबा व अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गेवराई, उमापुर व इतर गावे कडकडीत बंद.
गेवराई (प्रतिनिधी) दि. २३ निट पेपर फुटी झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर काही विद्यार्थ्यांनी अत्महत्या केल्यामुळे दिल्ली येथे अंदोलन सुरू होते या अंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष मारहान केल्याच्या निषेधार्थ व विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. प्रकाश आंबेडकर यांच्या अदेशावरुन महाराष्ट्र बंदच्या हाकेला साथ देत गेवराई शहरासह उमापुर व इतर गावा मध्ये व तालुकाभर बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला त्याबद्दल वंचीतचे राज्य उपाध्यक्ष प्रा. विष्णु जाधव, अजयकुमार (पप्पु) गायकवाड, राजेंद्र पोकळे, ज्ञानेश्वर हवाले, किशोर भोले, किशोर चव्हाण डीपीआय चे कार्यअध्यक्ष अमोल सुतार देवेंद्र दुंरधरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आण्णासाहेब राठोड तालुका अध्यक्ष, नेते राजेंद्र मोटे उमेश परदेशी अख्तर शेख, दलित पॅंथर चे युवा राज्य अध्यक्ष, छगन खरात व इतर यांनी व्यवसाईकांचे अभार मानले.
निटचा पेपर फुटल्यामुळे २० विद्यार्थ्यांनी अत्महत्या केली तसेच लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. पुन्हा निटचा पेपर घेतला त्यातही मार्कांची अफरातफरी झाल्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या अयोजीत अंदोलनात सहभाग घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनामा मागितला व अत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक १ कोटी रुपये शासकिय मदत देण्याची मागणी करत २० दिवस जंतर मंतंर येथे सोनम वांगचुक यांनी उपोषन केले. उपोषण सुरु असतांना अचानकपणे त्यांना पोलिसांनी दडपशाही करत उचलुन नेले म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अणखी संताप वाढला एकतर मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त झालेल्या अंदोलकांनी आपला मोर्चा शांततेत संसदभनाकडे वळवला संसदभवनाच्या १०० मिटर जवळ हा मोर्चा येताच दिल्ली येथील पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अश्रुधुरांच्या नळकाड्या फोडून, छर्ऱ्यांचा व खिळे ठोकलेल्या लाकडी काठ्यांनी अमानुषपणे मारहान केल्याने अनेक विद्यार्थी व पालक गंभीर जखमी झाले तर कित्येक बेशुद्ध झाले. शांततेत सुरू असलेल्या मोर्चावर पोलिसांनीच दगडफेक करून अनेक पोलिस वाहणे फोडली व पोलिसांनी अनेक अंदोलकांना जेरबंद करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केली.
अंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजिनामा घेण्यात यावा या मागण्या तात्काळ मान्य करण्यात यावा या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंद वंचीत बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
Comments
Post a Comment