मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये आज रक्तदान शिबीर

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये आज रक्तदान शिबीर 

‘रक्तदान महाअभियाना’त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा-डॉ.योगेश क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)
दि.२१ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भाजपच्या ‘रक्तदान महाअभियाना’त बीड येथील सौ.के.एस.के. महाविद्यालयात आज (दि.२२) सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज 'सेवा यज्ञाचा संकल्प' म्हणून साजरा केला जात आहे. भाजपच्यावतीने राज्यात 'रक्तदान महाअभियान' राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्यावर्षी प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, भाजप नेत्या ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात सेवा यज्ञाचा विक्रम केला असून जवळजवळ ७८ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यावर्षी हे उद्दिष्ट १ लाखांपेक्षा जास्त रक्तदाते असे आहे. त्यामुळे रक्तदानासाठी इच्छुकांनी सौ.के.एस.के. महाविद्यालयात आज (दि.२२) सकाळी ११ वाजता उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी