Posts

Showing posts from November, 2024

सेक्युलर पणाचा "आव" आणणारे "जयदत्त" शेवटी संघ परिवाराचेच - नितीन जायभाये

Image
( सेक्युलर कार्यकर्त्यांच्या जीवावर अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्या क्षीरसागरांनी अखेर धर्मनिरपेक्षेतेचा केला खून)         बीड प्रतिनिधी - नेहमी सेक्युलर पणाचा आव आणणाऱ्या क्षीरसागरांनी शेवटी जनतेचा विश्वासघात केलाच. जयदत्त क्षीरसागरांनी संघ-भाजपाच्या विचारसरणीला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे खरे रूपदर्शन आज जनतेला होत आहे. सेक्युलर कार्यकर्त्यांच्या जीवावर आयुष्यभर सत्ता व मोठी मोठी पदे, मंत्रीपदे भोगणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर सेक्युलर विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात करून, समृद्ध विचारांच्या महाराष्ट्र राज्याचे वाटोळे करणाऱ्या भाजपा-संघाच्या विचारसरणीच्या दावणीला जाणे पसंत केले आहे. जयदत्त क्षीरसागर ने जरी पाठिंबा दिला असला तरी बीडचे सुजाण नागरिक त्या पाठिंब्याला स्वीकारणार नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी व सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी हे क्षीरसागर कुटुंबीय कुठल्याही थराला जाऊ शकतात तसेच काहीही करू शकतात हे परत एकदा त्यांनी दाखवून दिलेले आहे. क्षीरसागर कुटुंबीयांनी गेल्या अनेक दिवसांपासून नाटकीय राजकारण चालवलेले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आधी अपक्ष फॉर्म भरला व &qu

ऐतिहासिक रणखांब शिलालेख बेकायदेशीर स्थलांतरण प्रकरणी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला तक्रार ; कारवाईची मागणी

Image
ऐतिहासिक रणखांब शिलालेख बेकायदेशीर स्थलांतरण प्रकरणी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला तक्रार ; कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.१२ ) बीड शहरातील चंपावती विद्यालय नगर रोडवरील फुटपाथवरील पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिकार क्षेत्रातील संरक्षित स्मारक " रणखांब शिलालेख" पुरातत्व विभागाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच कंत्राटदार आणि पुरातत्व व संग्रहालय विभागातील काही अधिकारी संगनमताने जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून दुरूस्तीच्या आदेशावर मुळ जागेवरून स्थलांतरित करण्याचे षडयंत्र रचले जात असुन संबंधित प्रकरणात वरीष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून पुरातत्व व शासनाची दिशाभूल करणा-या कंत्राटदार व आधिका-यांवर महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातन वास्तू शास्त्र विषयक स्थाने व अवशेष अधिनियम १९६० अनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि रामनाथ खोड यांनी सुजित कुमार उगले संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना करून आंदोलनाचा ईशारा दिला आह

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे शासन आधिका-यांचे दुर्लक्ष तर निवडणुकीच्या धामधुमीत पुढा-यांना विसर :- डॉ.गणेश ढवळे

Image
  बीड:- ( दि.११ ) सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाची आर्थिक मदत मिळण्यास विलंब होत आहे . शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्या कायमस्वरूपी नसल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत आहे.याचवेळी शासन, नेते आणि अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे.ऐरवी भाषणात शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे लोकप्रतिनिधीं याबाबत मुग गिळुन गप्प असल्याने याबद्दल तिव्र नाराजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबा गणेश कर यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ आक्टोबर पर्यंत या १० महिन्यात नापिकी , कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीमुळे आर्थिक नुकसान या गोष्टींमुळे तब्बल १५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद असुन केवळ ६५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनामार्फत दिली जाणारी १ लक्ष रुपयांची मदत मिळाली असुन उर्वरित कुटुंबिय मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.याचवेळी निवडणूकीचे कामकाज असल्याचे कारण देऊन शासन आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून

प्रास्थापिता विरोधात असणाऱ्या सर्वसामान्य शेख मंजूर यांना विजयी करा-ॲड.प्रकाश आंबेडकर

Image
वंचित आघाडीच्या सभेला माजलगावात अभूतपूर्व प्रतिसाद. माजलगाव प्रतिनिधी दि.10 माजलगाव विधानसभेची निवडणूक ही प्रस्तापित विरोधात एका सामान्य कुटुंबातील असणारा तरुण शेख मंजूर लढवत आहे.वंचित आघाडीच्या या दलित वंचित उपेक्षित मुस्लिम बहुजन घटकातील समाज बांधवांनी विजयी करावे असे आवाहन एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा माजी खासदार एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,माजलगाव मतदार संघातील सत्ता ही कायम एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर अशा घराणेशाहीत विभागल्या गेली आहे.वंचित आघाडीने एका सामान्य कार्यकर्त्याला शेख मंजूर यांच्या रूपाने उमेदवारी दिली आहे. विकासाची दूरदृष्टी असणारा हा युवक आपणा सर्वांना परिचित आहे.मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासा करिता अल्पसंख्यांक असणाऱ्या या उमेदवाराच्या पाठीशी साथ आणि समर्थन द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही आरक्षणाच्या विरोधात आहेत असेही ते त्यावेळी म्हणाले. आरक्षण म्हणजे मानसन्मान आहे तो कायम टिकवायचा असेल तर विधानसभेत जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार पाठवा असे मत आयोजित स

भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याच्या संरक्षण सचिव पदी अमरसिंग ढाका यांची निवड

Image
 बीड प्रतिनिधी - दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यकारिणीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याची भारतीय बौद्ध महासभेची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून यु .जी. बोराडे गुरुजी व महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा संरक्षण उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट स्टॉप ऑफिसर अशोक कदम यांची निवड करण्यात आली व भारतीय बौद्ध महासभा बीड पश्चिम चे कोषाध्यक्ष अमरसिंग लखमीचंद ढाका यांची महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षण सचिव पदी निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व बौद्ध बांधवांनी स्वागत व अभिनंदन केले.

मतदानाचा हक्क बजावताना शाळा, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते , स्मशानभूमी आदी मुलभूत सुविधांसाठी उमेदवारांना जाब विचारावा:- डॉ.गणेश ढवळे

Image
  लिंबागणेश:- ( दि.९ ) विकसित भारतासाठी मतदान हे आवश्यक असुन मतदान जनजागृती काळाची गरज असुन महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ निमित्ताने " उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा" या महाराष्ट्र शासनाच्या विशेष अभियानात सहभागी व्हावे यासाठी सर्वच मतदारांनी आवर्जून मतदान करावे.ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेतील महत्व आणि त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मताचा टक्का वाढवा आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी असुन याची जाणीव मतदारांना व्हावी.लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅनर लाऊन मतदानाचा हक्क बजावा आणि हक्क बजावताना शाळा, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, स्मशानभूमी सारख्या मुलभूत सुविधांसाठी मतदान मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना जाब विचारावा आणि.धर्म, जात पात,लिंग,भेद, विसरून मुलभूत सुविधांसाठी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे. धर्म,जात पात,लिंग भेद विसरून शाळा , आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, स्मशानभ

हतबल व गोरगरीब जनतेला "वाचवा"!धन दांडग्यांना परत परत मते देऊ नका! - नितीन जायभाये

Image
  सकल ओबीसी व सकल बहुजनांचे अपक्ष उमेदवार नितीन जायभाये यांचे जनतेला कळकळीचे आवाहन! बीड प्रतिनिधी - गरीब मरतोय या देशात एक नवीन पांढरपेशी, विकृत कट्टरवादी, लबाड धनदांडग्याची व्यवस्था निर्माण होत आहे व जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समृद्ध संविधानाला काही ना काही युक्त्या करून संपवायचे- बदलवायचे आणि या देशातील जनतेला धनदांडग्यांचे गुलाम करायचे, अशी एकाधिकारशाही व भांडवलदारशाही व्यवस्था निर्माण करण्याचे काम चालू आहे. हे सर्व लोक कट्टरपंथी विकृत व निर्दयी आहेत यांना गोरगरीब जनतेचे काहीही देणे- घेणे नाही त्यांना फक्त त्यांच्यासाठी काम करणारे व मेहनत करणारे गुलाम पाहिजेत. हुकूमशाही व्यवस्थेचे ते समर्थक आहेत. त्याच दिशेने देशाला ते घेऊन जात आहेत. माझ्या भावंडांनो भगिनींनो माय माऊल्यांनो जागे व्हा जागे राहा, रात्र वैऱ्याचीच आहे. जागृतपणे, विचारपूर्वक योग्य माणसालाच मतदान करा. पांढरपेशी धनदांडग्यांनी उभे केलेल्या व गुलामगिरीची व्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या उमेदवारांना मतदान करू नका हे नम्र आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे.

ऑल इंडिया पॅंथर सेना पक्षाच्या अपक्ष उमेदवार नितीन सोनवणे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू

Image
बीड प्रतिनिधी :-बीड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नितीन उत्तमराव सोनवणे यांनी बीड शहरातील सर्व महापुरुषांचा अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करून प्रत्यक्षात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून समाजसेवेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गोरगरिबांची सेवा करून न्याय मिळवून देणारे दलित मुस्लिम आदिवासी व बहुजन यांच्या हक्कासाठी संघर्षाची लढाई लढणारे सोनवणे यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकास करू म्हणून मताचा जोगवा मागणाऱ्या प्रस्थापित कुटुंबाने चाळीस वर्षे बीड मध्ये नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार, सर्व पदे स्वतःच्या कुटुंबातच घेतले गेली तीस ते चाळीस वर्षे प्रस्थापित कुटुंबाने बीडच्या विकासाची विल्हेवाट लावली बीड मतदारसंघातील अल्पसंख्याक वॉर्डात रस्ते,नाली व पाण्याची सुविधा नाही.आता बीड मतदारांना एक सुवर्ण संधी आली आहे बीडचा विकास करण्यासाठी नितीन सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून बीडचा विकास करण्याची द्यावी त्यांचे निवडणूक चिन्ह बॅट आहे आज मतदारांच्या भेट घेत असताना काही मतदारांनी त्यांना करीत असलेल्या

सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघर्ष समिती संघटनेचा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित रहा- डॉ जितीन वंजारे

Image
     बीड प्रतिनिधी :-सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघर्ष समिती संघटनेचा आज वर्धापन दिनानिमित्त व सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे यांच्या पुतणीचा श्रीशा नितीन वंजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त सर्व पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आव्हाहन डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार, स्नेहसंमेलण आणि स्नेहभोजन कार्यक्रम होणार असून आज दिनांक आठ नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता हॉटेल गोल्डन चॉईस बार्शी रोड बीड येथे होणार असून आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघर्ष समिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.           सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना कोणतेही मानधन मिळत नाही, त्यांना विशेष सरकारी योजनेचे लाभ दिले जातं नाहीत, त्यांच्या हातून गोर गरिबांची सेवा होते, देश सेवा घडते पण त्यांना मदतीचा हात कोणी देत नाही.

वंचित हाच सर्वोत्तम पर्याय इतर पक्षाच्या उमेदवारांचे चारित्र्य तपासा - पुरुषोत्तम वीर

Image
लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून...  बीड प्रतिनिधी - बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे म्हणजे विकास नव्हे. गावागावात या प्रस्थापित नेत्यांना व उमेदवारांना जाब विचारा. ही पायघड्या घालण्याची वेळ नाही.असेही पत्रकात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर यांनी म्हटले आहे. त्यांचे पक्ष भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. (1500)दीड हजरत लाडकी बहीण खरेदीचा धूर्त शक्कल हाणून पाडा. पक्षाची प्रतिमा पाहून मतदान करा. सत्तेचे रक्त तोंडाला लागलेल्या या प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. अशी वेळ आली आहे. तुमच्या लेकरांचे भवितव्य उज्वल करणारी ही निवडणूक आहे. फसव्या भूलथापांना बळी पडू नका तुम्ही ठरवलं तर अशक्य काहीच नाही.यावेळी त्यांना इंगा दाखवाच सर्वोत्तम पर्याय तुमच्या समोर आहे. बीड मतदार संघाचे नंदनवन

शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई तालुक्यातील आव्हाणे बु.येथे गावठी दारूच्या अड्डयावर छापा

 शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई तालुक्यातील आव्हाणे बु.येथे गावठी दारूच्या अड्डयावर छापा ४४ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन नष्ट { अविनाश देशमुख शेवगांव }9960051755 या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलिसांनी तालुक्यातील आव्हाणे बु. येथे गावठी दारूच्या अड्डयावर टाकलेल्या छाप्यात ४४ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन जप्त करण्यात आले. तालुक्यातील आव्हाणे बु. येथील भिल्लवाडा वस्ती येथे गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळाली. नागरे यांनी पोलीस पथकाला सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले. या वेळी आरोपींच्या कब्जातील ४४ हजार ५०० रुपये किंमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायण जप्त करण्यात आले. याबाबत पोकाँ. भारत बाजीराव अंगारखे पत्रकार : इसाक शेख व पोकाँ. संतोष हरिभाऊ वाघ यांच्या फिर्यादीवरू आरोपी गणेश छबुराव पवार (वय ४०), रा. भिल्लवाडा वस्ती आव्हाणे बु. ता. शेवगाव, विकास रामदास वाघम

मागासवर्गीय समाजाचे सर्व कर्ज माफ आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ निधीत वाढ करण्याचे वचन देणारासच मतदान करा - रानबा गायकवाड

Image
परळी प्रतिनिधी . महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय समाजाचे विविध बँका आणि महामंडळाचे कर्जे माफ करण्याचे तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात प्रत्येक वर्षी 5 हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचे वचन देणाऱ्या उमेदवार अथवा पक्षालाच समाजाने मतदान करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले आहे.        याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रानबा गायकवाड यांनी पुढे म्हटले आहे की,देशातील मोठ्या उद्योजकांची अब्जावधी रुपयांची कर्जे केंद्र आणि राज्य सरकारने माफ केलेली आहेत.परंतू सर्वसामान्य, गोरगरीब, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या विविध खाते आणि योजनेअंतर्गत तरतुतीमध्ये प्रचंड कपात केलेली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळासाठी बजेट दिले जात नाही. वर्षाकाठी काही कोटींची तरतूद करून बौद्ध समाजाच्या तोंडाला पाणी पुसले जात आहेत.      सध्या सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.महायुती असो अथवा महाविकास आघाडी याबरोबरच जे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांनी मागासवर्गीय समाजाच

वंचित बहुजन आघाडी बीड विधानसभेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न

Image
वंचित बहुजन आघाडी बीड विधानसभेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न  वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलाय निर्धार बीडचा आमदार पुरुषोत्तमच निवडून आणणार. (बीड प्रतिनिधी ) महात्मा ज्योतिबा,फुले राजश्री शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समतावादी विचार वंचित बहुजन आघाडी सातत्याने जोपासत आलेली आहे.या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित चा जाहीरनामा जो.शा.बा. समतापत्र वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला.हा जाहीरनामा सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक,राजकीय तसेच सांस्कृतिक सर्वांगीण विकासाचा अजेंडा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पुरुषोत्तम वीर यांनी केली.नाळवंडी नाका येथे आज दुपारी तीन वाजता वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब एजाज सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष ऍड.अनिता चक्रे,युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मेजर अनुरथ वीर, म

पत्रकार दिपाली पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा

Image
. बीड प्रतिनिधी    युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमामधील निवासीं सोबत केक कापून संगीतमय वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.  अग्रगण्य पध्दतीने समाजाचे समाजासमोर प्रतिबिंब मांडण्याचे काम दिपाली ताई पारसकर करत आहेत.आणि आम्हा सर्व पत्रकारांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. - पत्रकार दीपक घोसाळकर. वृध्दाश्रम मध्ये वाढदिवस साजरा केला पाहिजे त्यामुळे येथील निवासिना आनंद मिळतो. - पत्रकार सनिप कलोते . दिपाली पारसकर समाजसेवा आणि पत्रकारीतेमध्ये सर्वगुणसंपन्न आहेत. समाजसेवक यशवंत बिडये. यावेळी पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय भोईर, पत्रकार रत्नाकर पाटील , पत्रकार सुधीर पाटील , पत्रकार सुभाष वाघपंजे , पत्रकार दीपक घोसाळकर, पत्रकार सनिप कलोते, पत्रकार सुनील वारगडा , खुशी एंटरप्राजेसचे संचालक अजय दुबे, समाजसेवक यशवंत बिडये यशकल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा यशश्री बिडये जीवनज्योत वृध्दाश्रम चे संचालक श्रीदेवी

अखेर दिड वर्षापासुन धुळखात पडुन असलेली २०० खाटांची माता व बालसंगोपन ईमारत कार्यान्वित होणार ; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सुचना

Image
अखेर दिड वर्षापासुन धुळखात पडुन असलेली २०० खाटांची माता व बालसंगोपन ईमारत कार्यान्वित होणार ; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सुचना ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश:- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.०७ ) सन २०१६-१७ साली जिल्हा रुग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत माता व बाल रुग्णालय उभारण्यासाठी २१ कोटी रुपये निधीची मंजुरी मिळुन तरतूद करण्यात आली होती.मात्र कंत्राटदारांच्या ढिसाळ कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यानंतर गेल्या दिड वर्षापासुन इमारतीचे काम पूर्ण होऊनही आक्सिजन पाइपलाइन लिफ्ट, विद्युतीकरण, अग्निरोधक यंत्रणा आदी काम अपूर्ण राहिल्याने ईमारत २०० खाटांची ईमारत धुळ्यात पडुन होती. याचवेळी जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या अपु-या कोंदट व ईमारतीत उपचारांमुळे महिलांची हेळसांड होत होती. त्यामुळे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सहका-यांनी वर्षभरापासून निवेदन तसेच आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला.तत्कालिन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे यांनी आंदोलनाची दखल घेत जिल्हा रुग्णालयात प्

पुरे आता धनशक्तीला एकदाचे गाडा - पुरुषोत्तम वीर

Image
पुरे आता धनशक्तीला एकदाचे गाडा - पुरुषोत्तम वीर  बीड वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा झंजावात उद्यापासून मतदार संघात  बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी बीड विधानसभा मतदार संघाला घराणेशाहीची कीड लागली पासून ही निष्क्रिय घराणेशाही कायमची उघडून फेका असे कळकळीचे आवाहन वंचित बहुजन तरुण तडफदार उमेदवार तरुण तडफदार उमेदवार पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर पत्रकातून जनतेला केले आहे. डोळ्यात भरेल असे क्षीरसागर कुटुंबाचे असे एकही विकास काम केले नाही. शिवावरूनच चाललेली रेल्वे ही यांना शिरूर कासार मार्गे वळवता आली नाही. शेकडो एकर जमीन हडपून बसलेल्या क्षीरसागर कुटुंबाने ऊस उत्पादक शेतकरी पुरता नागवला गेला आहे. तीन पिढ्यापासून हे कुटुंब मतदार संघातील सत्तेची फळे चाखत आहे. आणि आत्ता तर एकाच कुटुंबातील दोघा जणांना आमदारकीचे डोहाळे लागल्यामुळे त्यांच्या सत्ता पीपासूपणाचा कहर समोर आला आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर वंचित अशा सर्व घटकाचा पुरता भ्रमनिरास करणाऱ्या या धनशक्ती कुटुंबस रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असून यावेळी या प्रस्थापित धनशक्ती रोखूच असा निर्धार वंचित बहुजन आ

केज राखीव मतदार संघाच्या विकासाचे चक्र फिरवण्यासाठी अपक्ष उमेदवार वैभव स्वामींना मिळाले ग्रामोफोन चिन्ह

Image
बीड प्रतिनिधी   232 केज अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून अपक्ष उमेदवार पत्रकार वैभव स्वामी यांना निवडणूक आयोगाकडून ग्रामोफोन चिन्ह मिळाले आहे. ग्रामोफोन प्रमाणे विकासाचे चक्र केज मतदार संघामध्ये फिरवण्यासाठी जागरूक आणि वंचित मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार वैभव स्वामी यांनी केले आहे. 232 केज राखीव मतदार संघामधून अपक्ष उमेदवार वैभव स्वामी उभे आहेत. एक उच्चशिक्षित बीएससी, एलएलबी, मास्टर ऑफ जर्नालिझम झालेले आहे. ते केज मतदार संघातील क्रांतिकारी येळंबघाट या गावचे मूळ रहिवासी आहेत. मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाल्यानंतर 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत केज मतदार संघाचे पहिले आमदार होण्याचा मान याच गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामलिंग स्वामी यांना मिळाला. तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, विकासाची दृष्टी लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे त्या काळातील रामलिंग स्वामी होय. आज त्यांचा नातू पत्रकार अँड वैभव स्वामी हे अपक्ष म्हणून 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये केज मतदार संघामधून उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. या म

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघात कशी असेल लढत ? माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट ?

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन -    दिवाळी संपताच माघारीची अंतिम तारीख असुन माघारीनंतरच ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.   ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन विदयमान आमदार हिरामन खोसकर, महाविकास आघाडी कडुन कॉग्रेस पक्षाकडुन लकी जाधव तर मनसे कडुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे प्रमुख उम्मीदवार रिंगणात उतरले आहेत. या तीनही उमेदवाराच्यां उमेदवार्या हया निश्चित झालेल्या आहेत.   यात माजी आमदार सौ. निर्मला गावित यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केली आहे.त्या प्रबळ उमेदवार आहेत.त्यामुळे या लढतीमध्ये रंगतदार वळण आले आहे.   सौ.निर्मला गावित यांचे सोबत कॉग्रेस व उबाठा शिवसेनेची मोठी ताकद उभी राहिली आहे. सलग दहा वर्ष त्या या मतदारसंघात आमदार म्हणुन कार्यरत असल्याने त्यांचा मोठा दबदबा व वर्चस्व या मतदारसंघात आहे.सौ.गावित या रिंगणात राहिल्या तर महाविकास आघाडी चा प्रमुख उमेदवार बाजुला सारला जाईल अशी भिती व्यक्त होत आहे.त्यामुळे लकी जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखीही वाढली