कल्याण अधिकारी ( प्र ), औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांच्या लेखी पत्र दिल्या मुळे कंत्राटी कामगारांना १९% मुळ वेतन पगारात व थकबाकी देण्यात येईल म्हणुन आमरण उपोषण तुर्त स्थगीत - भाई गौतम आगळे सर

परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती मार्गदर्शक कॉम्रेड नचिकेत मोरे तसेच कृति समिती अध्यक्ष कॉम्रेड वामन बुटले यांच्या मार्गदर्शना खाली आंदोलन...

कल्याण अधिकारी ( प्र ), औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांच्या लेखी पत्र दिल्या मुळे कंत्राटी कामगारांना १९% मुळ वेतन पगारात व थकबाकी देण्यात येईल म्हणुन आमरण उपोषण तुर्त स्थगीत - भाई गौतम आगळे सर
परळी ( प्रतिनिधी ) औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ मधील कंत्राटी कामगारांना १९% मूळ किमान वेतनामुळे मासिक वेतनात झालेली वाढ व एक एप्रिल २०२४ पासून ची थकबाकी आणि दिवाळी बोनस सह माहे ऑक्टोबर २०२४ चे वेतन दिवाळी आधी कंत्राटी कामगारांना न मिळाल्यामुळे दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता औष्णिक विद्युत केंद्र,परळी वैजनाथ, कार्यालयासमोर कामगार प्रतिनिधी यांनी आमरण उपोषण सुरू केले होते, ते सायंकाळी ५ ४५ वाजता कल्याण अधिकारी ( प्र ) शरद राठोड यांनी लेखी पत्र दिल्यामुळे सकाळी ११ वाजता सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी ०५: ४५ वा. तूर्तास स्थगित करण्यात आले,असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी कळविले आहे.
       याबाबत सविस्तर वृत्त असे की डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक ( मासं ) ( प्र ) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी बांद्रा ( पूर्व ) या कार्यालयाने एक परिपत्रक दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्मित केले होते त्यात त्यांनी दिनांक २४/०९ /२०२४ अन्वये वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मा.ना. उपमुख्यमंत्री तथा मंत्री( ऊर्जा ) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०९ / ०९ / २०२४ रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीमधील बाह्य स्त्रोतामधून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये बेसिक मध्ये १९% इतकी वाढ दिनांक ०१/०४/ २०२४ पासून करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने त्याची अंमलबजावणी तिन्ही कंपन्यांनी करणे बाबत कळविण्यात आले होते. कार्यरत बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारांना सुधारित मूळ वेतनाचा बेसिक मध्ये लाभ ऑक्टोबर २०२४ च्या वेतनात देण्यात यावा व केलेल्या कारवाईचा अहवाल सांघिक कार्यालयास सादर करण्यात यावा असे नमूद केले होते. त्याप्रमाणे कंत्राटी कामगारांच्या त्यांच्या हक्काचा मेहनताना त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करावा याकरिता मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र च्या कार्यालयासमोर रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली तर स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे मार्गदर्शक नचिकेत मोरे तसेच अध्यक्ष कॉम्रेड वामन बुटले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार प्रतिनिधींनी सकाळी 11 वाजता अमर उपोषणास सुरुवात केली होती त्या अनुषंगाने कल्याण अधिकारी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांनी कंत्राटी कामगारांना पगारात दिलेल्या 19 टक्के वाढीबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित करण्याची कार्यवाही मुख्यालय स्तरावर सुरू असून नवीन कंत्राटामध्ये वाढीव दर समाविष्ट केलेले आहे. तसेच तालुक्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने आपले दिनांक 19 / 11/ 2024 रोजी पासून सुरू असलेले अमरण उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र दिल्यामुळे मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालया समोरील आमरण उपोषण सायंकाळी 5:45 वा. तुर्तास स्थगित करण्यात आले, असे एका प्रसिद्धकांद्वारे रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी कळविले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी