बीडच्या विकासासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेत घ्यावे - नितीन जोगदंड
बीड दि.३० (प्रतिनिधी) बीड विधानसभेत डॉ.योगेश क्षीरसागर यांना अवघ्या ५००० मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र बीड मतदार संघाचा विकास करावयाचा असेल तर डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी नितीन जोगदंड यांनी केली आहे.
बीड मतदारसंघाची निवडणूक ही जातीपातीच्या राजकारणामुळे गाजली. यावेळी विकास कामांच्या मुद्द्यावर मतदान न होता जाती धर्मावर मतदान करण्यात आले. यामुळे डॉ. योगेश क्षीरसागर यांना पराभव स्वीकारावा लागला. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मा.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून बीड मतदार संघात अनेक विकासाची कामे झाली. डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांनी अजित दादा पवार आणि धनंजय मुंडे यांच्याकडे मागील एक ते दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला. त्या माध्यमातून बीड मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे केल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र बीडच्या काही ठराविक भागातील जनतेने विकासाकडे दुर्लक्ष करत जाती धर्मावर मतदान केल्याचे चित्र स्पष्ट पहावयास मिळाले. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मात्र त्या सरकार मध्ये बीड चा आमदार सत्तेत नसल्याने बीड चा विकास कुठे तरी संथ गतीने होणार आहे. मात्र बीडच्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना बीड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित दादा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातील रित्या झालेली विधानपरिषदेच्या जागेवर संधी द्यावी, अशी मागणी नितीन जोगदंड यांनी केली आहे.
Comments
Post a Comment