घोटी येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व प्रवर्तक संघटना ईगतपुरी तालुका यांचा मेळावा संपन्न
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन
आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक या ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेच्या प्रमुख कणा असुन या घटकासं आधिकाधिक सशक्त करण्याची गरज आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दयावे व आरोग्य व्यवस्था आधिक सुदृढ करावी असे आवाहन आयटक कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ.राजु देसले यांनी केले आहे.
घोटी येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक ईगतपुरी तालुका यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता.या मेळाव्यास मार्गदर्शन करतानां ते बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ईगतपुरी पंचायत समिती आरोग्य विभागाचे विस्तारआधिकारी विजय सोपे हे होते.
व्यासपिठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन कॉ.राजु देसले, माजी ग्रंथालय कर्मचारी तथा आयटकचे नेते ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, आहुर्ली चे माजी चेअरमन नवनाथ अर्जुन पा. गायकर, आयटकच्या प्राजक्ता कापडणी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरुन बोलतानां विस्तार आधिकारी विजय सोपे यांनी आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकाच्यां कामाचे कौतुक केले.ग्रामीण भागातील आरोग्य सुधारणेत संबधिताचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.तसेच यांच्या कामामुळे बालमृत्यु, गरोदर माता मुत्यु आदीचें प्रमाण लक्षणीय रित्या घटले आहे अशा शब्दात कौतुक केले.
यावेळी आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक यांनी आपल्या विविध समस्या या ठिकाणी मांडल्या.ज्यात प्रामुख्याने वेतनवाढीसह राज्य कर्मचारी यांचे प्रमाणे सुरक्षा आदीसह मागण्या मांडल्या आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा गटप्रवर्तक विदया जाधव, गीता बोराडे, अलका आगिवले, कमल बिन्नर , ज्योती टोचे, अनिता खातळे, सुवर्णा जमधडे, रेखा जाधव, भारती जमधडे, ज्योत्स्ना शेवाळे, संगिता सदगीर, किरण अग्रवाल , शांता गुंजाळ, रुक्मिणी वळकंदे, मनिषा क्षीरसागर आदिसह आशा स्वंयसेविका अनिता रोडे, शोभा बारवकर, राधिका दिवटे, रुक्मिणी मटाले, मनिषा वाजे, सुनिता जमधडे, शिला हांडोरे आदीनीं परिश्रम घेतले आहे.
या प्रसंगी ईगतपुरी तालुक्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक मोठया संख्येने हजर होत्या.
Comments
Post a Comment