विकासाची दृष्टी असणार्या कुंडलिक खांडे यांनाऑल इंडिया पँथर सेनेचा जाहिर पाठींबा- दिपक केदार
विकासाची दृष्टी असणार्या कुंडलिक खांडे यांना
ऑल इंडिया पँथर सेनेचा जाहिर पाठींबा- दिपक केदार
केदार यांच्या पाठींब्याने मला हत्तीचे बळ मिळाले -कुंडलिक खांडे
बीड(प्रतिनिधी) बीड विधानसभा क्षेत्राला आजी,माजी लोक प्रतिनिधींनी कायमच विकासापासून दुर ठेवण्याचे काम केले आहे. सत्तेत असो किंवा नसो जनतेला केवळ भुलथापा देवून त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. बीडला विकासाची दृष्टी असणारे आमदार भेटणार आहे. कुंडलिक खांडे यांच्याकडे विकासाचे नवे व्हीजन असून त्यांना आमचा पुर्ण पाठींबा असून आमचे सर्व कार्यकर्ते खांडेंना आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करतील यात शंका नाही असे प्रतिपादन ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केले. बीड येथील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या संपर्क कार्यालयात तिसर्या आघाडीचे उमेदवार कुंडलिक खांडे यांची भेट घेवून त्यांना पाठींबा देताना श्री.केदार बोलत होते.या प्रसंगी बीड विधानसभा क्षेत्रात ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कृत उमेदवार नितीन सोनवणे यांची उपस्थिती होती.
बीड विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या संपर्क कार्यालयात बुधवारी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार भेट देत खांडे यांना निवडणूकीत आपल्या पक्षाचा पाठींबा असल्याचे जाहिर केले. या प्रसंगी दिपक केदार म्हणाले की, ऑल इंडिया पँथर सेना ही विकासात्मक व रचनात्मक कार्य करण्यासाठी स्थापन झाली आहे. समाजातील उपेक्षीत, वंचित अशा घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही संघटनात्मक कार्य करत आहोत. अशाच पध्दतीचे कार्य बीड विधानसभा क्षेत्रात कुंडलिक खांडे हे करत असून त्यांच्या पाठीशी ऑल इंडिया पँथर सेना पुर्ण ताकतीने उभी राहिली आहे. आमच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कृत उमेदवार नितीन सोनवणे हे सुध्दा कुंडलिक खांडे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बीडच्या विकासाला प्रस्थापितांची नजर लागली असून सर्व समाज घटकाला सोबत घेवून जाणारे कुंडलिक खांडे यांचे नेतृत्व विधानसभेत जावे ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आमची ऑल इंडिया पँथर सेना सर्वशक्तीपणाला लावून खांडे यांना आमदार करणारच असे दिपक केदार म्हणाले.
या प्रसंगी ऑल इंडिया सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सुर्यकांत ठोसर, सुंदर वाघमारे, निसार शेख, पापा शेख, उमेश पारीख,कावेरी जाधव,दिक्षा मिरपगार, कोमल तुरुकमारे यांच्यासह पँथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी कुंडलिक खांडे म्हणाले की आपली भूमिका कायम ही राजकिय नसता विकासासाठी काम करण्याची राहिलेली आहे. समाजातील सर्व घटकाला मी एक सेवक आहे आणि त्यांच्यासाठीच मी विधानसभा निवडणूकीत उतरलो आहे. जनता नक्कीच आशिर्वाद देईल आणि त्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या संस्थापक दिपक केदार यांनी पाठींबा दिल्यामुळे मला हत्तीचे बळ मिळाले असल्याचे खांडे म्हणाले.
Comments
Post a Comment