शालेय साहित्य वाटप करून क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन



 महामानव अभिवादन ग्रुप तर्फे शालेय साहित्य वाटप 


वंचित बहुजन व स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडणारे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले होत हनुमंत कांबळे


 बीड प्रतिनिधी - मानवामध्ये स्पृश्य, अस्पृश्य उच्च- नीचतेतून व अनिष्ट रुढी परंपरेमुळे हजारो वर्षा शिक्षणा पासून वंचित असलेल्या बहुजन समाज व स्त्रियांना शिक्षणाची दारे आपल्या कृतीतून मुलींची पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारी उघडणारे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले 19 व्या शतकातील थोर क्रांतिकारक व समाज सुधारक होऊन गेले असे प्रतिपादन सहाय्यक उपनिबंधक सहकार खाते हनुमंत कांबळे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप तर्फे आयोध्या नगर व रमाई नगर परिसरातील 141 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अवसरमोल ए.एल.तर प्रमुख पाहुणे म्हणून महामानवा अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक एलआयसी यु.एस. वाघमारे, प्रशांत वासनीक, एड. तेजस वडमारे लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.जि . वानखेडे यांनी केले तर सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. ह्या प्रसंगी मंचावर कॅप्टन राजाभाऊ आठवले, श्याम वीर, आर.डी. यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसरे प्रमुख पाहुणे प्रशांत वाचनिक यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी अविधेमुळे सर्व सर्वां रसा तळाला गेले कसे हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. शिक्षण म्हणजे सत्य जाणणे व विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगून अंधश्रद्धे पासून दूर राहणे हे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिनी त्यांच्या विचारावर चालण्याचा दृढ निश्चय करून प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सीनियर के.जी. मधील आदिरा वडमारे या बालिकेने पाच ओळी संविधाना बद्दल इंग्रजीतून सुस्पष्टपणे भाषण केली त्याबद्दल तिचा वाचाल तर वाचाल वाचनालया तर्फे व महामानव अभिवादन ग्रुप तर्फे रोख रक्कम देऊन सत्कार केला. कार्यक्रमास अनिल वीर,प्रकाश खंडारे, रोहन खंडारे, संगीता खंडारे, मोतीराम मस्के, नागसेन मस्के, गुलाबराव बिक्कड गोदावरी पटेकर, रत्नमाला चक्रे, राधाबाई वीर,अनिल वीर, बाईजाबाई वीर, ज्योती शिरसाठ व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी