"चेहरा नवा बदल हवा" .."क्षीरसागर" मुक्त म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त बीड-नितीन जायभाये



( हीच खरी विकास पर्वाची नवी सुरुवात.. बीड "शहर बचाव मंचाने" दिली सर्व मतदार 'नागरिकांना' कळकळीची व विकासाची हाक..)

 बीड प्रतिनिधी -बीड शहर व पूर्ण मतदार संघातील परिस्थिती अतिशय दयनीय आहे. बीड मतदार संघातील कारभार अतिशय भ्रष्ट व टक्केवारी पद्धतीने व्यापला आहे. गेल्या 40 वर्षात क्षीरसागर घराण्याने बीड नगरपालिकेतुन बोगस बिले उचलून व भ्रष्टाचार करून अरबो रुपये कमविले. आज मीतिला बीडची नगरपालिका बुडण्याच्या स्थितीत असून कोट्यावधी रुपये कर्जामध्ये बुडालेली आहे. बीड शहरातील जनतेला अजूनही मूलभूत सुविधाच मिळालेल्या नाहीत. दुसरीकडे देश विदेशात,भारतातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये क्षीरसागर घराण्याचे उद्योग व्यवसाय तसेच प्रॉपर्टी वाढत चालले आहेत. बीड नगरपालिका पंचायत समिती, बाजार समिती, ताब्यातील अनेक संस्था या सर्व माध्यमांमधून अरबो रुपये भ्रष्ट व बोगस पद्धतीने कमावून त्याचे इतर मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये प्रॉपर्टीज मध्ये तसेच मोठे व्यवसाय उभे करण्या मध्ये रूपांतर होत आहे. दुसऱ्या बाजूला बीड शहरातील जनतेचा जीवनस्तर अतिशय खालच्या दर्जाला गेला आहे. बीड शहरातील व बीड ग्रामीण भागातील परिस्थिती अक्षरशः डोळ्यात अश्रू आणणारी आहे. जनतेचे जीवन अतिशय हालाखीचे झालेले आहे. ग्रामीण भागामध्ये आजही रस्ते नाहीत,पाणीची टंचाई आहे, लाईटची खूप मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, समस्यांची न संपणारी यादीच आहे पण समाधान नाही. या सर्व समस्या क्षीरसागरांच्या भ्रष्ट कारभारामुळे निर्माण झालेल्या आहेत.अशा परिस्थितीतही क्षीरसागर घराण्याचे पाणीपुरवठ्याचे बोगस टँकर चालू असतात. लोकांना पाणी नाही व बोगस टँकरचे पैसे हे उचलतात,यांना लाज कशी वाटत नसेल? लोकांचे रक्त पिण्याची प्रवृत्ती यांच्यात येते कुठून? काय करणार आहेत हे या सर्व प्रॉपर्टीच ? मेल्यानंतर वर घेऊन जाणार आहेत काय? कसलीही हाव आणि भूक यांची? ही कधीतरी संपणार आहे का? या सर्व परिस्थितीत बदल झाला पाहिजे. बदल झाल्याशिवाय गोरगरीब जनता व आपलं बीड वाचणार नाही, जनतेला न्याय मिळणार नाही. हे जनतेला बदलावं लागेल. जनतेला जागृत व्हावं लागेल. माझी सर्व बीड मतदार संघातील नागरिकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे उद्याच्या 20 तारखेला मतदानाचा हक्क जागृतपणे बजाऊन क्षीरसागरांची ही भ्रष्ट कारकीर्द संपवून टाका. विकास पर्वाची नवी सुरुवात नवी पहाट या मतदारसंघांमध्ये उजडू द्या. हीच संधी आहे. नसता पुन्हा पाच वर्ष डोक्याला हात लावून बसताल. बुडालेली बीड नगरपालिका, बीड मतदारसंघाचा ग्रामीण भाग वाचवा पर्यायाने बीड मतदारसंघ वाचवा असे मी सर्व नागरिकांना हात जोडून कळकळीचे आवाहन करत आहे.


 माझ्या समस्त भावंडांंनो बहिणींनो माय- मावश्या माऊल्यांनो सप्रेम नमस्कार,
मी श्री. नितीन मदनराव जायभाये सकलं ओबीसी सकलं बहुजन सकलं मुस्लिम सकलं एससी/ एसटी समाजाच्या न्याय हक्कासाठी बीड विधानसभेच्या रिंगणात उतरलेलो आहे. तीन माणसांचा समुह" नागरिक" असे माझे चिन्ह आहे. पारदर्शक,भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था व व्यवस्थेतील पारदर्शक ,सुसूत्रताबद्ध ,भ्रष्टाचारमुक्त कारभार
तसेच जनतेच्या हिताचे व सर्वांगीण विकासाचे निर्णय हेच माझे ध्येय आहे . ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वकाळ तत्पर, कार्यशील राहून जागरूकपणे कार्यरत राहील असे अभिवचन सर्वांना देतो. तरी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी माझ्या अनुक्रमांक 21 "नागरिक"( तीन माणसांचा समूह) या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे विनम्र आवाहन मी सर्व मतदार बंधू भगिनींना करत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी