अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी सतर्क रहावे:काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ संपर्क साधावा-सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे


आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  
              आष्टी तालुक्यातील 
 आंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की,दिवसा व रात्रीचे चोरीचे प्रकार काही ठिकाणी घडले आहे . तसेच काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे .
तर काही ठिकाणी जनावरे चोरीचे प्रयत्न झाले आहेत . 
तरी अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांनी सतर्क राहुन आपले घर सुरक्षित करून किमती ऐवज , सोने, रोख रक्कम व इतर मौल्यवान ऐवज सुस्थितीत ठेवावे ही विनंती . 
विशेषता रोड लगत घर असणाऱ्या नागरिकांनी जास्त सतर्क रहावे .
अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत कोठेही काही अनुचीत प्रकार घडत असेल तर त्याबाबत तात्काळ अंभोरा पोलिसांना माहिती द्यावी , असे आवाहन मंगेश साळवे
प्रभारी अधिकारी
पोलीस स्टेशन अंभोरा यांनी केले आहे .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी