ओबीसी,एस्सी,एसटी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वंचित चा आमदार करा.पुरुषोत्तम वीर
(बीड प्रतिनिधी) भाजपा,काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना तसेच अजित पवार गट,शिंदे गट,या पक्षांनी ओबीसींच्या आरक्षण विषयक आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.ओबीसी एससी एसटी यांचे आरक्षण धोक्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणुका नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तेव्हा आरक्षणवादी समूहांनी आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मतदान करून आरक्षण वाचवण्याच्या च्या भूमिकेत राहिले पाहिजे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे बीड विधानसभेचे उमेदवार पुरुषोत्तम नारायणराव वीर यांनी केले.पुरुषोत्तम वीर यांनी शहरातील विविध भागातील मतदारांच्या गाठीभेटी वर भर दिलेला असून त्यांनी आज बीड शहरातील दिलावर नगर एकता नगर,चक्रधर नगर मोमीनपुरा,दिलीप नगर,पंचशील नगर पूरग्रस्त कॉलनी,शास्त्रीनगर इस्लामपुरा, गजानन नगर, नागोबा गल्ली, नागरीकांशी संवाद साधला.या भागातील नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वीर यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शहराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments
Post a Comment