जयदीप कवाडे यांना महायुतीचे घटक पक्ष म्हणून मंत्रिमंडळात समावेश करा - अनिल तुरुकमारे
बीड प्रतिनिधी - महायुतीचा निकाल स्पष्ट बहुमताने लागण्यास घटक पक्ष म्हणून पीपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांची संपूर्ण महाराष्ट्रभर महत्वाची भूमिका राहिली आहे. विधानसभेच्या निवडणूक काळात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेऊन महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. व त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. या गोष्टीची दखल घेत उद्या होत असलेल्या मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रमात घटक पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांना मंत्रिमंडळात शपथ द्यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे मराठवाडा सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. महायुतीने स्पष्ट बहुमत घेतले असल्याने महायुतीने घटक पक्षाचा देखील घेऊन मंत्री मंडळ स्थान देऊन महायुतीचा सन्मान राखावा अशी अपेक्षा घटक पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment