महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक बापू खांडेंच्या पाठीशी बीडची जनता उभी:- पॅंथर नितीन सोनवणे
युती धर्म पाळून कुंडलिक बापू खांडे यांना विक्रमी मतांनी विजयी करा. सध्याचे वर्तमान सरकार साम दाम दंड भेदाची नीती वापरून जरी महाराष्ट्रातील राजकारण बिघडण्याचे काम करत आहे. हे गोड स्वप्न पाहणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या शब्दावर महाराष्ट्रातील जनता प्रेम करते
लोक कल्याणकारी काम संभाजी राजे भोसले यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून होत आहे याच निमित्ताने बीड जिल्ह्यातील जनतेने कुंडलिक बापू खांडे यांना विक्रमी मताने विजय करून इतिहासात नोंद करण्यासाठी बालाघाटाची जनता छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड विधानसभेचे उमेदवार पुंडलिक बापू खांडे यांना बहुमताने विजय करणार आहे
कारण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही एकच नाण्याच्या बाजू आहेत महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आदरणीय छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या माध्यमातून सर्व बहुजनांना एकत्रित करण्यासाठी उभा राहिलेला आहे त्यांना तुम्ही साथ द्यावा अशी सर्व मतदारांना मी विनंती करत आहे.
कुंडलिक बापू खांडे हे आपल्या हक्काचे व्यक्तिमत्व आहे इथल्या प्रत्येक घटकांच्या आणि अडचणी व प्रगतीसाठी ते अहोरात्र झटत असतात त्यामुळे त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे.
भूल थापांना बळी पडू नका मी युती धर्मच पाळणार व युती धरून पाळून कुंडलिक बापू खांडे यांना विक्रमी मतांनी विजयी करा असे आव्हान ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment