अंबिका चौकात ट्रॅफिक जाम कायमस्वरूपी मार्ग काढा अन्यथा आंदोलन करू-समाजसेविका सारिका गायकवाड
बीड प्रतिनिधी - बीड शहरात अंबिका चौक हा प्रमुख चौक असल्याने त्या ठिकाणी सातत्याने सकाळी व सायंकाळी ट्रॅफिक जॉब होत आहे. अंबिका चौकात पोलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. परंतु या ट्रॅफिक जामचा सर्व जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना महिलांना वृद्ध व्यक्तींना व वाहनचालकांना त्रास होत आहे. बीड शहरातील गजबजलेल्या चौका पैकी हा अंबिका चौक प्रमुख चौक आहे. तात्काळ ही समस्या सोडविण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सारिका गायकवाड यांनी ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्यानंतर प्रत्यक्ष स्पॉटवरून बातमी करून पाठवली आहे. वाहतूक पोलीस शाखेचा एखादा कर्मचारी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे कारण अंबिका चौकातून पुढे बायपास कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक मंगल कार्यालय आहेत. बीड शहरात रिंग रोड ह्याच चौकातून पुढे जातो. बीड नगरपालिका व वाहतूक तात्काळ लक्ष घालून यावर उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment