रूग्णालयाच्या अग्निरोधक यंत्रणेसाठीच्या निधीसाठी एमआरआय , कार्डियाक कॅथलॅब साठी लक्ष्यवेधी शेकोटी आंदोलन
रूग्णालयाच्या अग्निरोधक यंत्रणेसाठीच्या निधीसाठी एमआरआय , कार्डियाक कॅथलॅब साठी लक्ष्यवेधी शेकोटी आंदोलन:- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२५)बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह अधिनिस्थ इतर १७ अशा एकुण १८ आरोग्य संस्थांच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणेसाठीच्या ३३ कोटी ३१ लाख रुपयांचे प्रस्ताव ३ वर्षांपासून धुळखात पडुन असुन त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा
तसेच जिल्हा रुग्णालयात एमआरआय,कार्डिअक कॅथलॅब सुविधा तातडीने उपलब्ध करावी तसेच माता- बालरुग्णालयाची ईमारत वापरात आणावी या विविध आरोग्य विषयक मागण्यांकडे जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी
सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२५ सोमवार रोजी बीड जिल्ह्य रूग्णालय आवारात जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी पाठवलेल्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यासाठी लक्ष्यवेधी " शेकोटी आंदोलन करण्यात आले. निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस,सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार,मुबीन शेख , रामधन जमाले बीड जिल्हाध्यक्ष ( इंटक)आदी सहभागी होते.
आहे.
रूग्णालयातील इमारतींसाठी अग्निरोधक यंत्रणेसाठी ३३ कोटी ३१ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करावी
----
बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह अधिनस्थ ईतर १७ अशा एकुण १८ आरोग्य संस्थांच्या इमारतीमध्ये अग्निरोधक बसविण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने शासनाला मार्च २०२२ मध्ये ३३ कोटी ३१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक पाठवत निधी आवश्यक असल्याने निधीची मागणी केली.या घटनेला ३ वर्षे उलटुनही निधी देण्याबाबत शासन स्तरावरून कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत.तसेच जिल्हा नियोजन आयोगाकडून सुद्धा तरतूद करण्यात आली नाही.त्यामुळे शासन जानेवारी २०२१ मध्ये भंडारा जिल्ह्यातील आणि नोव्हेंबर २०२१मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णालयातील आगीच्या घटनेसारखी वाट पहात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अग्निरोधक यंत्रणेसाठी संस्थानिहाय लागणारा खर्च (अंदाजे)
१) स्वराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबेजोगाई १२ कोटी
२) जिल्हा रुग्णालय बीड ५ कोटी ३३ लाख
३) आष्टी ग्रामीण रुग्णालय १ कोटी ४३ लाख
४) उपजिल्हा रुग्णालय केज ३ कोटी १४ लाख
५) परळी उपजिल्हा रुग्णालय २ कोटी
६) स्त्री रूग्णालय नेकनुर ९५ लाख
७) ग्रामीण रुग्णालय पाटोदा ३७ लाख
८)ट्रामा केअर सेंटर तेलगाव १६ लाख
९) ग्रामीण रुग्णालय नांदुरघाट ९७ लाख
१०) ग्रामीण रुग्णालय धारूर १ कोटी ३९ लाख
११) ग्रामीण रुग्णालय तालखेड ९९ लाख ७० हजार
१२) माजलगाव ग्रामीण रुग्णालय १ कोटी
१३) ग्रामीण रुग्णालय रायमोह १३ लाख ३४ हजार
१४) ग्रामीण रुग्णालय चिंचवण १३ लाख ३४ हजार
१५) ग्रामीण रुग्णालय धानोरा १४ लाख
१६) वृद्धत्व आरोग्य व मानसोपचार केंद्र लोखंडी सावरगाव ४ कोटी ४४ लाख
१७) स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव ७ लाख ३६ हजार
१८) परिचर्या महाविद्यालय लोखंडी सावरगाव ३२ लाख ३४ हजार
अशाप्रकारे एकुण ३३ कोटी ३१ लाख रूपयांच्या निधीची आवश्यकता असुन तातडीने त्याची तरतूद करण्यात यावी .
एमआरआय सुविधा उपलब्ध करा
----
बीड जिल्हा रुग्णालयाची स्थापना १९५० साली होऊनही रूग्णालयाला आता ७५ वर्षें होऊनही मेंदुतील ताप, शरीरातील धमन्या, अपघातात मेंदू व शरीरांतर्गत तपासणी करण्यासाठी आवश्यक एमआरआय सुविधा उपलब्ध नसुन रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असुन रूग्णांना बाहेरून तपासणी करुन आणण्यात "गोल्डन आवर" वाया जात असल्याने वेळेवर उपचार होत नाहीत त्यामुळे रूग्ग दगावु शकतो त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयात एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
कार्डियाक कॅथलॅब सुविधा उपलब्ध करण्यात यावी
---
जिल्ह्याच्या ठिकाणी कार्डियाक कॅथलॅब मंजुरीच्या घोषणा अनेकवेळा करण्यात आल्या.३ वर्षांपूर्वी शासनाने निर्णय देखील घेतला मात्र जागा, उपकरणे व तज्ञ यामुळे अद्याप मुहूर्त लागलाच नाही.हद्यविकाराच्या रूग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते.मात्र कार्डियाक कॅथलॅब नसल्याने रूग्णांना खाजगी रुग्णालयात लाखो रुपये मोजावे लागतात किंवा मृत्युला कवटाळावे लागते त्यामुळे कार्डियाक कॅथलॅब सुविधा तातडीने उपलब्ध करण्यात यावी.
Comments
Post a Comment