महामानव अभिवादन ग्रुप तर्फे संविधान दिन उत्साहात संपन्न
बीड प्रतिनिधी - इंग्रजाच्या गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताने लोकशाही गणराज्य प्रणाली स्वीकारली व व्यक्ती, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित भारतीय संविधानामुळेच भारतीय लोकशाही आबादीत राहील असे प्रतिपादन प्रमुख वक्ते एड.एस.एम.साळवे यांनी केले.
सर्वप्रथम तथागत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प,पुष्प माला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असलेल्या महामानव अभिवादन ग्रुपने आयोजित केलेल्या संविधान दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक शांताराम जोगदंड अध्यक्षपदी तर प्रमुख पाहुणे ऍड. हनुमंतराव कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, मंचावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, डी.जि.वानखेडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले, एड. तेजस वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानव अभिवादन ग्रुपने एकता नगर, बलभीम नगर व नागोबा गल्ली बीड येथील विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल जागृत करून 184 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यात (वही पेन) मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधित करताना एड. एस. एम.साळवे यांनी प्रत्येक भारतीय नागरिकांनी घटनेने दिलेले हक्क व कर्तव्य समजून घेणे व त्यानुसार आपले आचरण ठेवणे कसे गरजेचे आहे, असे अनेक उदाहरणाद्वारे समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम.राऊत तर प्रस्ताविक माजी नगरसेवक राजू जोगदंड यांनी केले.
मुलांना संबोधित करताना प्रशांत वासनिक म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच एखाद्या ग्रंथाप्रमाणे संविधानाचे वाचन करून आपले हक्क व कर्तव्याबद्दल जागृत राहून माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे व संविधानानेच देशाचा राज्यकारभार चालतो तरी उच्च विद्याविभूषित होऊन प्रशासकीय सेवेत जाऊन देश हिताचे कार्य करावे हे अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. संविधानाच्या अंमलबजावणी दिवसा पासून पूर्वीच्या, मानवहिताच्या विरुद्ध जे अनिष्ट नियम होते ते एका दिवसात घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे नष्ट केले हे समजावून सांगितले. हनुमंतराव कांबळे यांनी संविधानाचे प्रास्ताविक म्हणजे घटनेचे सार आहे तरी प्रार्थनेसारखे दररोज सकाळी आपली दिनचर्या सुरू करण्या पूर्वी वाचन करून तसे आचरण करावे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमास आयु. नैतिक भोले, भीमराज काकडे, आर्यन भोले, संघर्ष इनकर, रजनीकांत वाघमारे, कोमल वाघमारे, भगीरथी वाघमारे, कमल वाघमारे, वंदना वाघमारे, जमुनाबाई वडमारे, सुमन जोगदंड, शांता अक्का, रमाबाई जोगदंड, इंदिराबाई जोगदंड, बजरंग जोगदंड, सविता जोगदंड व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. संविधान प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment