ऊसतोड कामगाराची पोरगी झाली अधिपरिचारिका
बीड शहरापासून 25-30 किलोमीटरच्या अंतरावरत वसलेलं वैद्यकिन्ही हे गाव खरंतर दोन -तीन हजार लोक वस्तीच गाव.त्याच गावात ज्ञानोबा पारवे आणि सुशीला पारवे हे दांपत्य राहत. आयुष्याला अठराविश्व् दारिद्र्य लाभलेलं असताना.आपल्या विचारात शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार आणि कार्य रक्तात मिसळून घेणाऱ्या आणि चळवळीत अगदीच भाग घेऊन अन्यायाला वाचा फोडणारे हे कुटुंब.ऊसतोड कामगार कधी कोल्हापूर,कधी सांगली तर कधी सातारा या ऊस असलेल्या शहरात हे कुटुंब आपल्या चार छोट्या चिल्या पिल्यांना घेऊन त्यांना जगवण्यासाठी चाललेली ही धडपड.बाबासाहेब नेहमी म्हणायचे तुम्हाला चांगला माणूस बनायचं आणि बनवायचा असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे आणि हेच वाक्य आपल्या उराशी बाळगून त्यांनी कष्टाला पोरांच्या शिक्षणाला कधीच काहीच कमी पडू दिल नाही. एक एक दिवस उपाशी पोटी काढला पण पोरांचं शिक्षण थांबवलं नाही.बघता बघता घरातील चार ही पोरांना चांगल शिक्षण दिलं पोराला ग्रॅज्युएट केल.तिन्ही पोरींच नर्सिंग पूर्ण केलं.पोरांनीही आईचा आणि बापाचं कोयता बंद करायचं हे ध्येय मनाशी या चार भावंडांनी बाळगून उंच झेप घ्याची ठरवली.आणि बाबासाहेबांच्या शब्दा आपण प्रमाणे आपण शहरात गेलो पाहिजे आणि मग यांनी थेट मुंबई गाठली.हॉस्पिटल जॉईन केलं.कोविड सारख्या जीव घेण्या काळात त्यांनी माणुसकी आणि देश वाचवला.दिवस उजाडत गेला रोज उगवणाऱ्या सूर्याला चॅलेंज दिल गेलं.ध्येय वेड्या मनात फक्त एकच जिंद्द होती ती म्हणजे गव्हर्नमेंट सर्विस आणि इथल्या शोषित पिढीत लोकांची आपल्या हातून सेवा व्हावी.झोपडीतल्या लोकांना आरोग्य द्यावं त्यांची सेवा करावी.आणि इथल्या बहुजनासाठी आपलं आयुष्य खर्च करावं हेच एक उद्दिष्ट घेऊन मग सुरु झालं अभ्यास.
यातच घरातून चळवळीची शिकवण लाभलेली असतानाच.वाचनात आले इथले संत ज्यांनी माणुसकीची व्याख्या सांगितली.त्यानंतर अनेक पुस्तक हातात पडत गेलीत. शब्दाला धार लागली आणि सुरु झाला साहित्य प्रवास.
आईच बाबाच दुःख,समाजाच दुःख आपल्या लेखणीतून जगाला सांगावं त्यासाठी आपण लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे. आणि मग काय बघता बघता तो विद्रोहाचा ज्वालामुखी संत तुकोबा,नामदेव ढसाळ नसानसात कधी आला ते समजलंच नाही. मग काम आणि कवी संमेलन आंदोलन हे चालूच झालं.मुंबई असो नाहीतर दिल्ली असो अन्याय झालेल्या लेकींच्या मागे उभ राहीलच पाहिजे हीच बंडाची आरोळी देऊन काम चालू झालं.आपल्या नोकरीवरती अतोनात प्रेम करून आपलं कष्ट प्रामाणिक आहे.हे सिद्ध झालं पाहिजे.आणि आपल्याला कायमची गव्हर्मेंट नोकरी पाहिजे म्हणजे समाजासाठी हातभार लावता येईल.याच विचारानं गव्हार्मेंटची परीक्षा देण्याचा विचार बाळगून कधी चार तास तर कधी पाच तास अभ्यास करून चारच दिवसापूर्वी आपलं नाव गव्हार्मेंटच्या यादीत लावणारी ती....
आता तुम्हाला वाटलं असेल एवढं सगळं लिहिलं गेल. दुःख,कष्ट दारिद्र पण ती कोण आहे...
ती आहे.ऊसतोड कामगारांची पोरगी जिच्या लेखणीन मेलेले मुडदे सुद्धा जागे होतात.
शिव शाहू फुले आंबेडकर विचारांची डरकाळी फोडणारी वाघीण
इथल्या भांडवलशाहीला,आपल्या लेखणीच्या जोरावरती गुडघे ठेकवायला लावणारी
कधी विद्रोहाची तर कधी बंडाची तर कधी प्रेमाची
हाक देणारी.
विद्रोही कवयित्री कु. आम्रपाली ज्ञानोबा पारवे
Comments
Post a Comment