बीड शहरातील रबर उडुन गेलेले रंबल स्ट्रीप (रबरी गतिरोधके) अपघाताला निमंत्रण, लोखंडी नट बोल्ट उघडे पडल्याने टायर फुटुन संभाव्य अपघाताचा धोका :- डॉ.गणेश ढवळे


बीड:- ( दि.२२ ) बीड शहरांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या धुळे ते सोलापूर सिमेंट काँक्रीट राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी असणारी अपघात प्रवण क्षेत्र असणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा रुग्णालय याठिकाणी रस्ता क्रॉसींग असुन या ठिकाणी बसविण्यात आलेली रंबल स्ट्रीप (रबरी गतिरोधके) दुरावस्थेत असुन तुटल्याने रबर उडुन गेल्याने गतिरोधकाचे लोखंडी नट बोल्ट उघडे पडले असुन त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होऊन अथवा फुटुन अपघाताचा धोका वाढला असुन तातडीने नविन रंबल स्ट्रीप (रबरी गतिरोधक) बसविण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी नितिन गडकरी, प्रकल्प संचालक तथा व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर,कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग बीड, जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली असुन आठवडाभरात नविन गतिरोधक न बसवल्यास दि.०२ सोमवार रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

सविस्तर माहितीस्तव 
---
अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी नागरीकांकडुन गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येते त्याठिकाणी नागरीकांचा रोष कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून गतिरोधक बसविण्यात येतात.मात्र त्याची नंतर देखभाल करण्यात येत नसुन आता हेच गतिरोधक अपघातांना कारणीभूत ठरत असुन रबरी गतिरोधक तुटल्याने रबर उडुन गेल्याने उघडे पडलेल्या लोखंडी नट बोल्ट मुळे वाहनांचे टायर पंक्चर अथवा फुटून अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने नविन गतिरोधक बसविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गेल्या वर्षी तातडीने नविन गतिरोधके बसवली होती:- डॉ.गणेश ढवळे 
---
गेल्यावर्षी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी बीड शहरांतर्गत अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या जिल्हा रुग्णालय क्रॉसिंग ,पोलीस अधीक्षक कार्यालय समोर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रबरी गतिरोधकांचे रबर रबर उडुन केवळ लोखंडी नट बोल्ट शिल्लक राहिल्याने वाहनधारकांना त्रास होत होता त्याचबरोबर वाहनांचे टायर फुटुन अपघाताचा धोका वाढला होता.संबधित प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे तत्कालीन पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांना दि.९ ऑक्टोबर रोजी रास्तारोको आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर याची तात्काळ दखल घेत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांना संबंधित प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाचे व्यावस्थापक यांना आवश्यक उपाययोजना करणेबाबत तातडीने गतिरोधकाची दुरुस्ती करण्याचे कळवले होते.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नविन गतिरोधक बसविण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्यमान पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कारवाई करतील अशी अपेक्षा डॉ.गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी