जातीने जरी माळी नसले तरी पण माळी समाजाच्या नेहमी सुखदुःखात साथ देणाऱ्या आमदार सुरेश धस यांना मंत्री करुन सर्वसामान्यांची कामे करण्याची संधी द्यावा- रामेश्वर गोरे,हानुमान शेलार,गणेश शेवाळे यांची मागणी


पाटोदा (प्रतिनिधी) जातीपातीच्या राजकारणाला कधीही थरा न देणारे सर्व जाती धर्मातील सामान्य माणसाच्या नेहमी सुखदुःखात धाऊन जाणारे महायुतीचे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आष्टी विधान सभेच्या निवडणुकीत भूतो ना भविष्य अशा प्रचंड मतांनी निवडून येऊन महाराष्ट्र राज्यातील जनतेची मन जिंकली आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जाती पातीच्या राजकारणाला थरा न देता आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात ऐतिहासिक विजय मिळवनार्या आमदार सुरेश आण्णा धस यांना पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी संधी द्यावी अशी मागणी पाटोदा नगरपंचायतचे सभापती रामेश्वर गोरे, निरगुडी गावचे माजी सरपंच हनुमान भैय्या शेलार,माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी केली आहे.केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेने मोठा कौल दिला आहे. त्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासह महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या मनातील प्रश्नांची जान असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आष्टी विधानसभेचे लोकनियुक्त आमदार लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांनी महायुतीच्या सरकार काळात विविध विकासकामे करून आष्टी पाटोदा मतदारसंघात आपली वेगळीच छाप निर्माण केली आहे तीच महाराष्ट्र राज्यात छाप पडावी म्हणून महायुती सरकार मधील पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश आण्णा धस यांना महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री मंडळात संधी देऊन महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनातील खरा मंत्री म्हणून संधी द्यावी अशी मागणी पाटोदा नगरपंचायतचे सभापती रामेश्वर गोरे,निरगुडी गावचे माजी सरपंच हानुमान भैय्या शेलार, माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी केली आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी