लिंबागणेश उपकेंद्रातील अनागोंदी कारभारामुळे विजेअभावी रब्बी पिके धोक्यात ; महावितरणच्या विरोधात गुरूवारी रास्तारोको :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- ( दि.३०) बीड तालुक्यातील लिंबागणेश आणि पंचक्रोशीतील गावांमधील विजेच्या समस्येने तिव्र रुप धारण केले असुन दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असुनही वीजे अभावी शेताला पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील कांदा ज्वारी,गहु, हरभरा आदी पिके वाळु लागल्याने शेतकऱ्यांना हातची पिके वाया जाण्याची धास्ती असुन लिंबागणेश येथील ३३ केव्ही.उपकेंद्रातील उप अभियंता पद २ महिन्यांपासून रिक्त असुन लाईनमन वेळेवर ड्युटी करत नसल्याने तसेच मुख्यालयी रहात नसल्याने रात्री अपरात्री ग्रामस्थांना फ्युज टाकणे,केबल बदलणे आदी कामे करावी लागत असुन महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.५ डिसेंबर गुरूवार रोजी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन कार्यकारी अभियंता महावितरण बीड यांना दिले आहे. निवेदनावर विक्की वाणी, हरिओम क्षीरसागर,अक्षय वाणी, महादेव कुदळे,जनार्धन वाणी, सय्यद बशीर, राजेंद्र ढास, श्रीकांत शिंदे, शिवाजी ढास, नानासाहेब वायभट, संतोष भोसले आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वीजपुरवठा कमी दाबाचा असल्याने लिंबागणेश येथील पाणीपुरवठा बाधित :- सरपंच बालासाहेब जाधव
लिंबागणेश आणि पोखरी (घाट) गावाला भायाळा साठवण तलावातुन पाणीपुरवठा होत आहे.मात्र कमी दाबाचा वीजपुरवठा विद्युत मोटारी सुरळीत चालत नाहीत. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा १५ दिवसांपासून बंद असुन पाण्यावाचुन ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पोखरी ( घाट) येथुन पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र फीडरची व्यवस्था करण्यात यावी.
लाईनमन मुख्यालयी नसल्याने ग्रामस्थांना रात्री अपरात्री फ्युज टाकावे लागते:- हरिओम क्षीरसागर ( ग्रामस्थ)
लिंबागणेश येथील उपकेंद्रातील उप अभियंता पद अडीच महिन्यांपासून रिक्त असुन दिवसा कार्यालयात लाईनमन हजर नसतात.विजे संदर्भात फोन केला तर घेत नाहीत टाळाटाळ करतात. मुख्यालयी लाईनमन रहात नसल्याने रात्री अपरात्री फ्युज टाकणे आदी कामे ग्रामस्थांनाच जीव मुठीत धरून करावी लागतात.कारण गावठाण रोहित्रांची दुरावस्था असुन जळालेले केबल,उघडे वायर, झाडांच्या फांद्यामधुन गेलेल्या विजेच्या तारा सगळंच धोकादायक असुन एखादी दुर्दैवी घटना घडल्यास महावितरण कार्यालय जबाबदारी घेणार काय?? असा संतप्त सवाल ग्रामस्थ हरिओम क्षीरसागर यांनी केला आहे.
Comments
Post a Comment