बीडच्या मतदारांची वंचितच्या पुरुषोत्तम वीर यांनाच पसंती.
(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार पुरुषोत्तम वीर यांनी बीड मतदार संघ पिंजून काढले असून त्यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकारणी,युवक कार्यकारणी, तसेच सेवानिवृत्त सेलचे पदाधिकारी, याबरोबरच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील सर्व पदाधिकाऱ्यांनी डोअर टू डोअर प्रचारात आघाडी घेतली आहे. बीड मतदारसंघाचे सर्वांगीण विकासाचे मुद्दे व जोशाबा समतापत्र जाहीरनाम्यात केजी टू पीजी सर्वांना शिक्षण,पदवी व पदव्युत्तर तरुण-तरुणींना पाच हजार रुपये दोन वर्षासाठी,तसेच महिलांसाठी वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत यासह सुरक्षित बहिणी योजना अंतर्गत महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी, अल्पसंख्यांक तसेच मुस्लिम समाजासाठी मोहम्मद पैगंबर बिलाद्वारे धर्मगुरू तसेच पवित्र धार्मिक ग्रंथांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही यासारखे असंख्य मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक प्रचारात उतरलेली आहे.पुरुषोत्तम वीर यांना शहरासह गाव वस्ती वाडा तांड्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. येणाऱ्या २० तारखेला पुरुषोत्तम नारायणराव विर यांच्या गॅस सिलेंडर या चिन्ह समोरील अनुक्रमांक 9 चे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सर्वसामान्यांकडून करण्यात आला.
Comments
Post a Comment