लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी शेतकरी व कष्टकर्‍यांनी चळवळ उभी करावी - मा.आ.उषाताई दराडे


बीड ( प्रतिनिधी ) पुणे येथे डॉ.बाबा आढाव यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे बिभित्स रुप पाहून सुरु केलेल्या उपोषणला पाठींबा देण्यासाठी बीड  येथे राष्ट्रीय एकात्मता समितीने महात्मा गांधी पुतळया समोर धरणे आंदोलनात माजी आमदार उषाताई दराडे यांनी शेतकरी कष्टकर्‍यांची चळवळ उभी करण्याचे आवाहन केले.
बीड येथे छत्रपती संभाजी क्रिडांगणतील महात्मा गांधी पुतळया समोर धरणे आंदोलन करण्यात आले सदर धरणे आंदोलनात राजकुमार घायाळ, सुनिलक्षीरसागर, शेरजमाखान पठाण यांचेसह बीड हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष शेख मुस्तफा,भास्कर खांडे,समता प्रतिष्टानचे किरण घाडगे,शुभांगी कुलकर्णी,सामजिक कार्यकर्ते भास्कर बागडे, भारत जोडो अभियानाचे जीवन राठोड, पेंटर संघटनेचे शेख मैनुद्दिन,बंडु दळवी,सय्यदअजमतअली, इरफान इनामदार,ओमप्रकाश नेमाने,अशोक बादाडे,सदाशिव प्रभाळे,बबन कुकडे, कामगार संघटनेचे राजु भोले असंघटीत मजदूर पंचायतचे बबन घुमरे यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवीला यावेळी भारत जोडो अभियानचे जिवन राठोड यांनी लोकशाही व संविधान वाचवण्याच्या चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले तर राजकुमार घायाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले शेवटी रामभाऊ बादाडे यांनी सर्वांचे आभार मानले

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी