दि.३० डिसें. रोजी अ. भा. म. सा.प. चे १३ वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

    अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक यांचे वतीने दरवर्षी आयोजीत होणारे राज्यस्तरीय नवोदित व ग्रामीण साहित्य संमेलन यंदा पुढिल महिन्यात दि.३० डिसें २०२४ रोजी आयोजीत केले जाणार असल्याची माहिती आयोजक,अखिल भारतीय मराठी साहित्य उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष सुप्रसिध्द लेखक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी दिली आहे.
  शासनाचे एक रुपयाचेही अनुदान न घेता लोकसहभागातुन आयोजक नवनाथ गायकर व त्यांचे सगळे सहकारी मिळुन हे साहित्य संमेलन करत असतात. या साहित्य संमेलनाचे यंदाचे तेरावे वर्ष असुन सन २०१२ पासुन सुरु झालेल्या या साहित्य चळवळीस तब्बल १२ वर्षे म्हंणजे एक तप पुर्ण झाले आहे.
  हे साहित्य संमेलन एक दिवसाचे असुन यात दिवसभर भरगच्च साहित्यीक मेजवानी असणार आहे.
  सकाळी ग्रंथदिंडी , उद्धाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण सोहळा, परिसंवाद,चर्चासत्र, विविध वक्त्याचें साहित्यीक आख्यान, कथाकथन, कवि संमेलन आदी अनेक कार्यक्रमाचां यात समावेश असणार आहे.
  १३ वे एकदिवसीय साहित्य संमेलनाची तारीख निश्चीत झाली असुन, कार्यक्रमाचे स्थळ, रुपरेषा, प्रमुख पाहुण्याची नाव निश्चीत झाली कि याची सविस्तर घोषणा करण्यात येईल अशी माहिती गायकर यांनी दिली आहे.
  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष मा.देविदास खडताळे व जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांचे मार्गदर्शना खाली परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष माणिकराव गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, जिल्हा पदाधिकारी रविद्रं पाटिल, राजु आतकरी, योगेश जोशी, लता पाटिल, बाबासाहेब थोरात, मधुकर कदम, श्रीराम तोकडे, संजय कान्हव, देवचंद महाले, तुकाराम चौधरी, पुनम राखेचा, माधवी पारख, विदया पाटिल, कल्पना सोनवणे, रोहिणी चौधरी, देविदास वारुंगसे, देविदास शिरसाट, तुकाराम चौधरी, शांताराम वाघ, सागर हांडे, रुपचंद डगळे, शिवाजी क्षीरसागर, अँड. पांडुरंग तथा विशाल काजळे, प्रदिप पाटिल आदिसह असंख्य पदाधिकारी,, साहित्यीक व साहित्यप्रेमी परिश्रम घेत आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी