अँड.स्वप्निल गलधर यांची शिवसेना ( शिंदे गट) पक्षाच्या बीड जिल्हा प्रमुखपदी निवडीचे लिंबागणेश येथे आतिशबाजीने जल्लोषात स्वागत
लिंबागणेश:- ( दि.२१ ) शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी (कार्यक्षेत्र आष्टी/ पाटोदा / गेवराई विधानसभा ) नियुक्ती शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली असुन वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास व्यक्त केला आहे.
आज सायंकाळी लिंबागणेश येथे अँड, स्वप्निल गलधर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल स्व.अमोलभैय्या गलधर युवा मंच लिंबागणेश यांच्या वतीने गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवतीर्थ लिंबागणेश याठिकाणी आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी " एकच भैय्या, स्वप्निल भैय्या" घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी औदुंबर नाईकवाडे, सय्यद अख्तर, सचिन आगवान,सुरज कदम,करण वायभट,पप्पु अवसरे, अशोक थोरात, हनुमंत थोरात, गणेश तावरे, ओंकार पवार, बालाजी निर्मळ,बबलु आबदार, अशोक कांबळे, योगेश शिंदे, विक्की जाधव,कीरण थोरात, अक्षय थोरात, आप्पा थोरात आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment