जिल्हा माहिती कार्यालय असुन अडचण नसुन खोळंबा ; निवडणुकीसाठी माध्यम संनियंत्रण कक्ष केवळ नावालाच -डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.१५ ) जिल्हा माहिती कार्यालयाकडून मतदारांसाठी बातम्यांच्या माध्यमातून व्यापक पद्धतीने जनजागृती होत नसुन विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेला माध्यम संनियंत्रण कक्ष केवळ नावालाच असुन कक्षा द्वारे निवडणुकीच्या संदर्भातील बातम्या माध्यमांना देणे आवश्यक असताना यात हलगर्जीपणा होत असुन यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता असुन संबंधित प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बीड यांना ईमेल द्वारे केली आहे.
सविस्तर माहितीस्तव
----
मतदारांनी मतदान यादीत नाव कसे पहावे, कोठे शोधावे याची माहिती बातम्यांच्या माध्यमातून देणे आवश्यक असुन मतदारांसाठी मतदान केंद्रावर कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत, सुविधा न मिळाल्यास मतदारांनी कोठे तक्रार करावी ही माहिती माध्यमांद्वारे सर्व सामान्य मतदारांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.सीव्हीजील ॲपवर किती तक्रारी आल्या व किती निकाली काढल्या याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देणे गरजेचे आहे. गृहमतदान,आधिका-यांनी केलेल्या मतदानाची आकडेवारी बातम्यांद्वारे प्रसिद्धी माध्यमांना देणे आवश्यक आहे.आधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मतदान कधी आहे, कोणत्या कालावधीत मतदान करावे याची माहिती देणे आवश्यक आहे.शासकीय बातम्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध करवुन सर्व सामान्यांत जनजागृती करणे हे मुळ काम जिल्हा माहिती कार्यालयाचे आहे. परंतु ज्या कामासाठी कार्यालय चालविले जाते ते कामच होत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी माध्यम संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.या कक्षा द्वारे निवडणुकीच्या संदर्भातील बातम्या माध्यमांना देणे आवश्यक आहे मात्र या कामांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करताना दिसत असुन यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment