महायुती सरकार मध्ये लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पद द्यावे :-ज्ञानेश्वर मुंडे

भाजपाचा ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार आ.पंकजाताई मुंडे

महायुती सरकार मध्ये लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पद द्यावे :-ज्ञानेश्वर मुंडे
परळी दि.27 प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन करत घवघवीत यश संपादन केले. या विजयात भाजपाचा स्टार प्रचारक भाजपचा राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे या शिल्पकार ठरल्याचे विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे म्हणले .
 संदर्भात ज्ञानेश्वर मुंडे म्हणले की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या.या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सर्वत्र लढत झाली त्या लढती मध्ये जनतेने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला.या निवडणुकीत महायुतीने जे उमेदवार दिले ते सर्व जनतेतील उमेदवार होते.महायुतीचा उमेदवाराचा प्रचारार्थ भाजपाचा स्टार प्रचारक भाजपचा राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्र भर प्रचार दौरे प्रचार सभा घेऊन महायुतीचा जनमताचा कौल घेत महायुतीने सरकारने गेल्या अडीच वर्षात राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ,मुख्यमंत्री लाडका भाऊ,तीन सिलेंडर मोफत,वीज बिल माफ ,वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास , महिलांना हाफ तिकीट, नमो किसान योजना, यासह इतर महत्त्वाचा व लोकहिताच्या क्रांतिकारी योजना प्रत्यक्षात राबवत लोकहित जोपासल्याचे आ. पंकजाताई मुंडे यांनी ठिकठिकाणी घेतलेल्या सभेतून सांगितले विषेश म्हणजे पंकजाताई मुंडे मध्य प्रदेशचां प्रभारी असताना तिथे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आणली तीच योजना महाराष्ट्रात सुरू करावी याची मागणी पंकजाताई यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजितदादा पवार यांना केली त्यांनी मान्य करून योजना चालू केली ती अतिशय लोकप्रिय झाली आणि लाडका बहिणीचा आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचे पूर्ण बहुमताचे सरकार आले .पंकजाताई यांनी घेतलेला 56सभेपैकी 52 उमेदवार निवडून आले आहेत. या ऐतिहासिक विजयामध्ये पंकजाताई मुंडे यांचे खूप मोलाचे योगदान असून पंकजाताई ह्या विजयाच्या शिल्पकार ठरला आहेत असे ज्ञानेश्वर मुंडे यांनी म्हणले आहे 
समस्त ओबीसी समाज आणि मुंडे समर्थक यांचा वतीने महायुती सरकार मध्ये पंकजाताई मुंडे यांना मंत्री पद द्यावी हीच आमची मागणी आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी