अजित दादा, बीड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधान परिषदेची संधी द्या -राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांची मागणी
बीड(प्रतिनिधी):- बीड विधानसभेत जातीपातीच्या राजकारणात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचा अवघ्या ५ हजार मतांनी निसटता पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना बीडच्या जनतेने ९६५५० मते दिली असून या मताची किंमत ठेवून पक्षश्रेष्ठींनी बीडच्या जनतेच्या मनातील खरा आमदार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधानपरिषदेचे संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांनी केली आहे.
केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने मोठा कौल दिला आहे. बीड विधानसभेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर हे तत्पर असून त्यांनी मागील काही वर्षात महायुतीच्या काळात विविध विकासकामे करून जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले याची पावती म्हणून महायुतीकडून डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली मात्र या निवडणुकीत डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचा निसटता पराभव झाला आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर हे विधानसभेत विजयी झाले आहेत. त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली असून अजित दादा आपण विटेकरांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना बीड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषदेची संधी देऊन बीडच्या जनतेच्या मनातील खरा आमदार म्हणून संधी द्यावी अशी मागणी बीड शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment