लोकशाही पत्रकार संघाच्या आष्टी तालुका अध्यक्षपदी अण्णासाहेब साबळे यांची निवड



 आष्टी प्रतिनिधी
 अण्णासाहेब साबळे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत.त्यांनी अनेक पत्रकार संघात देखील काम केलेले आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत (बीबी) वैद्य यांनी आष्टी तालुका अध्यक्षपदी अण्णासाहेब साबळे यांची निवड केली आहे.त्यांना लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव मुंबई,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष मंगला वाघ मुंबई,प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे बीड,प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख,प्रदेश उपाध्यक्ष रामदास तपसे केज,वसीम आजाद सिल्लोड,प्रभाकर पांडे नांदेड, प्रदेश सचिव हमीद खान जालना, कार्याध्यक्ष आयुब खान पठाण औरंगाबाद,मुंबई प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय हंडीबाग केज,आत्माराम वाव्हाळ,बिलाल शेख,यांच्यासह ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष तथा दिव्यांग कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष नवनाथ लोंढे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 आष्टी तालुका अध्यक्षपदी अण्णासाहेब साबळे यांची निवड केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष म्हणाले की,लोकशाही पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेणार आहेत.विविध समित्या स्थापन करून आष्टी तालुक्यात सर्वत्र विकास केला जाईल.विविध कार्यक्रम साजरे केले जातील.एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न तालुकाध्यक्ष अण्णासाहेब साबळे यांच्या माध्यमातून केला जाईल. तालुकाध्यक्ष अण्णासाहेब म्हणाले की,लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्ये करणार असून लोकशाही पत्रकार संघाचे नावलौकिक वाढवेल.आपण माझे वर जो विश्वास दाखविला आहे. त्याचे सार्थक नक्कीच करीन.अशी खात्री मी देईल.यावेळी तेज वर्ता डिजिटल आवृतीचे संपादक निसार शेख,प्रा.बबन उकले,पत्रकार जावेद पठाण,राजेंद्रकुमार ठाकुर,अशोक माने,चंद्रकांत मोरे,रंगनाथ काकडे उपस्थित होते.या सर्वांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी